महाराष्ट्र

आता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये घोटाळा, सीबीआय ने दाखल केला एफआयआर सिंगला यांच्या आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून ९.५ कोटींचे कर्ज घेतले होते.

मुंबई - देशातील बँकिंग क्षेत्रातील मोठे घोटाळे एकापाठोपाठ एक उघड होत असताना आता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे. थकीत कर्जा प्रकरणी उद्योगपती अमित सिंगला आणि अन्य व्यक्तींविरोधात बँक ऑफ महाराष्ट्रने सीबीआयकडे एफआयआर नोंदवला आहे. सिंगला यांच्या आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून ९.५ कोटींचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

चारा छावणी घोटाळ्याचे गुन्हे आठवड्याभरात नोंदवा, हायकोर्टाचे आदेश

मुंबई (वृत्तसेवा) दुष्काळात राज्यभरात लावण्यात आलेल्या चारा छावणीत झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी आठवड्याभरात गुन्हे दाखल करा असे, निर्देश मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. कारवाई करण्यात दिरंगाई करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करू, अशी तंबीही हायकोर्टाने दिली.

नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते महिला बचत गटांना फिरता निधीचे वाटप

सिल्लोड ( प्रतिनिधि ) दि.22 अंत्योदय राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत सिल्लोड नगर परिषदेतील महिला बचत गटांना फिरते भांडवल म्हणून प्रत्येकि महिला बचत गटास 10 हजार रूपयांचा धनादेश नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्याहस्ते देण्यात आला. शुक्रवार ( दि.16 ) रोजी नगर परिषद कार्यालयात धनादेश वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

जोपर्यंत जाती आहेत तो पर्यंत जाती आधारित आरक्षण राहणार;सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा प्रयत्न झाल्यास तो उधळून लावू -ना. आठवले

मुंबई दि. 22 - या देशात जोपर्यन्त जाती आहेत तोपर्यन्त जातीवर आधारित आरक्षण राहणार .दलित आदिवासी ओबीसिंच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आधी जातीव्यवस्था नष्ट करा मग जाती आधारित आरक्षणाविरुद्ध बोला. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल तर सर्व ताकदीनिशी तो प्रयत्न हाणून पाडू. जाती नष्ट झाल्याशिवाय जाती आधारित अरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केली.

परळीतील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रतिवर्षी पांचशे रुपयांची वाढ ना.पंकजाताई मुंडेंच्या पुढाकाराने उर्जामंत्र्यांसोबत मंत्रालयात झाली प्रकल्पग्रस्तांची बैठक

मुंबई(प्रतिनिधी)परळी वीज महानिर्मिती कंपनीतील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थिंना रुजू झाल्याच्या वर्षापासून प्रतिवर्षी पांचशे रुपयांची मानधनवाढ देण्यात येणार असून नव्या भरती प्रक्रियेतही त्यांना ग्राहय धरले जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने उर्जामंत्र्यांसोबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठवाडा: जलस्रोतांचे इस्रायल करणार सर्वेक्षण; दुष्काळ हटवण्यासाठी सरकारचा इस्रायलशी करार

मुंबई- मराठवाड्यातील कृषी, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची समस्या साेडवणे, या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ‘मेकोरोट’ या इस्रायलच्या राष्ट्रीय स्तरावरील जल कंपनी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात महत्त्वपूर्ण करार झाला. त्यानुसार मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील भौगोलिक परिस्थिती, पायाभूत सुविधा आणि जलस्रोतांचा सर्वंकष अभ्यास या कंपनीच्या तज्ज्ञांमार्फत करून प्रकल्प अहवाल सरकारला दिला जाईल. 

इज्तेमा परिसराची प्रशासनाच्यावतीने पाहणी इज्तेमासाठी प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य-विभागीयआयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर

औरंगाबाद (प्रतीनीधी.)-लिंबे जळगाव येथे 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या इज्तेमासाठी आयोजकांनी उत्तम नियोजन केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आयोजकांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी सांगितले.

लिंबे जळगांव येथील कार्यक्रमस्थळांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. यावेळी मुख्य आयोजक सोहेममुल्ला, एकबाल देसाई तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

परभणीत एक लाखाची लाच घेताना उपजिल्हाधिकारी चतुर्भूज 

परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास गायकवाड यांच्या कक्षातच एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

23-24 फेब्रुवारीला प.विदर्भ आणि उ.महाराष्ट्रात गारपिटीची पुन्हा शक्यता

नाशिक : उत्तर महाराष्ट्रावर पुन्हा एकदा गारपिटीचं सावट आहे. कारण, 23 फेब्रुवारीदरम्यान उत्तर महाराष्ट्रात गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून हिरे खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर

मुंबई (वृत्तसेवा) नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून रोखीने हिर खरेदी करणारे देशातील ५० ख्यातनाम उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटी आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. नीरव मोदीच्या कार्यालयांवरील छाप्यामुळे ही बाब समोर आली असून हे सर्व जण आता चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत.

प्रोझोन मॉलमधील ब्रँडेड स्टोअरवर ED चा छापा

औरंगाबाद- पंजाब नॅशनल बॅंकेच्या 11400 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयच्या (ईडी) पथकाने शहरातील प्रोझोन मॉलमधील शॉपर्स स्टॉपवर छापा टाकला आहे.

शिवनेरी गडावर भाजप विरोधी घोषणा; पंकजा मुंडे आणि विनोद तावडेना शिवसैनिकांनी रोखले

पुणेहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर संतप्त शिवसैनिकांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या

आडूळजवळ अपघात झालेल्या ट्रकमधून बिअर पळवत तळीराम झाले झिंगाट

औरंगाबाद : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडूळनजीक बिअरचा ट्रक पलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या भागातील तळीरामांनी ट्रकमधील बिअरचे बॉक्स पळवले आणि रस्त्यालगतच्या शेतातच बिअर पिऊन झिंगाट झाले.

विश्वासार्हता हेच पत्रकारितेचे वैभव - विजय दर्डा

पिंपरी-चिंचवड : विश्वासार्हता हेच पत्रकार आणि पत्रकारितेचे वैभव आहे. बातमीत तथ्य असेल तर पत्रकाराने निर्भीडपणे मांडावे. वृत्तपत्राचे नाते वाचकाशी असायला हवे. आजची माध्यमे दबावाखाली काम करीत आहेत, असे वाटत असून हे देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे पत्रकारांनी बातमीच्या माध्यमातून समाजाला सत्य तेच सांगावे, असे आवाहन लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी केले. 

कर्जमाफी देणं हे येड्यागबाळ्याचं काम नाही, धनंजय मुंडे यांचा सरकारला टोला

नाशिक -  २००८ साली पवार साहेबांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी विनासायास आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात दिली होती. पण सरकारला इतके महिने होऊनही कर्जमाफी द्यायला जमली नाही. शेवटी 'इथे पाहिजे जातीचे हे येड्यागबाळ्याचे काम नाही'  अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सटाणाच्या जाहीर सभेत सरकारला टोला लगावला.

नागपुरात पत्रकाराच्या आईचा, मुलीच्या खूनामागे भिशीचे कारण, एका दुकानदारास अटक

नागपूर- उपराजधानी नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थवर सातत्याने टीका होत असताना नागपुरातील एका युवा पत्रकाराची आई आणि दीड वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अतिशय निर्घृणपणे दोघींची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दोघींचे मृतदेह पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले. भिशीच्या वादातून घराजवळील किराणा दुकानदाराने दोघींची हत्या केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

केंद्र सरकारने संघाच्या स्वयंसेवकांना काठी घेऊन सीमेवर पाठवावे-शरद पवार; मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार

पंढरपूर (वृत्तसेवा) देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक आपल्या प्राणपणाची बाजी लावतात. पण त्यांच्या ऐवजी आता केंद्र सरकारने संघाच्या स्वयंसेवकांना हाफ पँट-शर्ट घालून आणि काठी घेऊन देशाच्या सीमेवर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवावे म्हणजे भागवतांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे ते देशाला समजेल अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये बोलत असताना त्यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आपली खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

देशात स्वातंत्र्य दावणीला: न्या. नरेंद्र चपळगावकर

मुंबई (वृत्तसेवा) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारवर केलेल्या टीकेनंतर आज माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी सरकार आणि समाजाला धारेवर धरले. ’मला स्वातंत्र्य आहे तसे दुसर्‍याला नाही का? सिनेमा पटला नाही मग पाहू नये ना. तुम्ही दुसरा काढा. तुम्ही आपले विचारस्वातंत्र्य कोणाही बाबा, संत, महाराज यांच्या चरणी वाहू नका. सरकारला किंवा समांतर शक्तीला बंदीचा अधिकार देऊ नका. सगळ्याच सासवा सारख्या असतात.

औरंगाबादच्या प्रेमीयुगुलाची दावलवाडीजवळ विष पिऊन आत्महत्या 

बदनापूर ( जालना ) : औरंगाबाद येथील एका प्रेमी युगुलाने तालुक्यातील  दावलवाडी फाटयाजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. हे प्रेमी युगुल बुधवारपासून (दि.14)  औरंगाबाद येथून बेपत्ता होते. 

छिंदमला कैद्यांनी तुडविले अहमदनगर कारागृहातील प्रकार; जोरदार घोषणाबाजी

 नगर, (प्रतिनिधी):- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याला आज (शनिवार) सबजेल कारागृहात शिवप्रेमी कैद्यांकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. 

Pages