Add new comment

आता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये घोटाळा, सीबीआय ने दाखल केला एफआयआर सिंगला यांच्या आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून ९.५ कोटींचे कर्ज घेतले होते.

मुंबई - देशातील बँकिंग क्षेत्रातील मोठे घोटाळे एकापाठोपाठ एक उघड होत असताना आता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे. थकीत कर्जा प्रकरणी उद्योगपती अमित सिंगला आणि अन्य व्यक्तींविरोधात बँक ऑफ महाराष्ट्रने सीबीआयकडे एफआयआर नोंदवला आहे. सिंगला यांच्या आशीर्वाद ग्रुपच्या कंपन्यांनी बँकेकडून ९.५ कोटींचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड न झाल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये घोटाळा
नवी दिल्लीत सीबीआयनं एका हिरे व्यापर्‍याविरोधात फसवणूकीची केस दाखल केली आहे.  या हिरे व्यापर्‍यानं बँकेत ३९० कोटी रुपयांचा  महाघोटाळा केल्याचे समोर आलं आहे. ३९० कोटी रुपयांचा हा महाघोटाळा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेत झाला आहे. सीबीआयनं कथित महाघोटाळ्याप्रकरणी द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनं ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या तक्रारीनंतर ही कारवाई केली आहे.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने सीबीआयकडे सहा महिन्यापूर्वी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यामध्ये कंपनीचे संचालक सभ्य सेठ, रीता सेठ, कृष्ण कुमार सिंह, रवी सिंह आणि कंपनी द्वारका दास सेठ एसआयजेड इनकॉर्पोरेशन यांची नावे आहेत. द्वारकादास सेठ इंटरनेशनल प्रा. लिमिटेडने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) या बँकेतून २००७ ते २०१२ दरम्यान ३९० कोटींचं कर्ज घेतले होते.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.