मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्गार काढले आहेत. ‘सबका साथ-सबका विकास’ व्याख्येचा आणखी विस्तार, नवभारताची निर्मितीकडे वाटचाल आहे, असे फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.