महाराष्ट्र

मिलिंद एकबोटेला कोर्टात काळं फासण्याचा प्रयत्न, पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ

पुणे-  (प्रतिनिधी):-काेरेगाव-भीमा दंगलप्रकरणी अटक करण्यात अालेला समस्त हिंदू अाघाडीचा कार्याध्यक्ष मिलिंद एकबाेटे याला पुन्हा एकदा दोन दिवसाची पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पुणे सत्र न्यायालयाच्या आवारात एकबोटेवर काळं फासण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो अयशस्वी झाला.

प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला-संभाजी भिडे

सांगली, (प्रतिनिधी):-कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे गुरूजींनी केला आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय स्वार्थ आणि मतांसाठी या दंगलीचा वापर करण्यात आला. या दंगलीचे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जावी, अशी मागणी करत येत्या २८ मार्चला महाराष्ट्रात मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

‘मोदी’मुक्त भारतासाठी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र यावं; राज ठाकरेंचे आवाहन

मुंबई ,( प्रतिनिधी):-गुजरात दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी माझ्यासमोर चांगलं चित्र उभा केलं, मात्र, ते सगळं खोटं होत. आता मोदींचा खरा चेहरा माझ्या समोर आला आहे. २०१९ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदी मुक्त भारत व्हायला हवा. मोदींच्या परदेश दौऱ्यातून एकही रुपया भारतात आला नाही. मोदी हे केवळ खोटे बोलणारे नेते आहेत. ते जर पुन्हा सत्तेत आले तर देशाची आणखी वाट लागेल. त्यामुळे आता मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त बोलत होते.

युतीशिवाय भाजपाची स्वबळावर सत्ता आणू- गिरीष महाजन

जळगाव:(प्रतिनिधी): राज्यात आम्ही त्यांचे मोठे भाऊ आहोत, हे मित्र पक्षाने समजून घेतले पाहीजे, सध्या मित्रपक्षाला सहज गोंजारतोय मात्र आगामी काळात आम्हाला युतीची गरज भासणार नाही, आम्ही स्वबळावर सत्ता मिळवू, असा टोला आज राज्याचे जलसंपदामंत्री 

ते द्वेषाचं राजकारण करतात, आम्ही प्रेमाचं : राहुल गांधी

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- देशात द्वेष पसरवला जात आहे, देशाला विभागलं जात आहे, मात्र आपण देशाला जोडण्याचं काम करुया, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना केले. ते कॉंग्रेस महाअधिवेशनाच्या छोटेखानी भाषणात बोलत होते.

मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव; तेलगू देसम, तृणमूल, एमआयएमचा पाठिंबा

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):-आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्यात येणार असून या ठरावाला तृणमूल कॉंग्रेस, तेलगू देसम पक्ष, एमआयएमने पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेसनेही या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहे. तर शिवसेना या ठरावात तटस्थ राहणार असल्याची चर्चा आहे.

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंवर औरंगाबादमध्ये शाईफेक

औरंगाबाद, (प्रतिनिधी):-  सराटे हे संघाचे समर्थक असून ते मराठा आरक्षणाविरोधात काम करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शाई फेकली. सराटे यांच्या संस्थेला सर्वेक्षणाचे काम दिल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते नाराज होते.

औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव सक्तीच्या रजेवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, (प्रतिनिधी):-कचराकोंडीवेळी मिटमिटा येथे गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळताना असंवेदनशीलता दाखवत नागरिकांच्या घरावर दगडफेक केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.

मिलिंद एकबोटेंना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

पुणे, (प्रतिनिधी):- हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप एकबोटे यांच्यावर आहे.
काल सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली.

राज्यसभा निवडणुकीतून भाजपाच्या विजया रहाटकर यांची माघार

मुंबई, (प्रतिनिधी):-राज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. भाजपने मात्र तीन जागांसाठी चौथा उमेदवार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनाही रिंगणात उतरवले होते. परंतु, आज (गुरूवार) अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. रहाटकर यांच्या उमेदवारीमुळे एका उमेदवाराचे भवितव्य धोक्यात आले होते. आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘ईव्हीएम’ म्हणजे इच व्होट फॉर मोदी: गुजरातमधील मंत्री

अहमदाबाद, (वृत्तसंस्था):-गुजरात विधानसभेत माहिती व प्रसारण विभागाच्या १२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीवर प्रदीपसिंह जडेजा बोलत होते.

दूध भेसळखोरांना ३ वर्ष कारावास, लवकरच कायदा : गिरीश बापट

मुंबई, (प्रतिनिधी):- राज्यात दूध भेसळ करणार्‍यांना शिक्षा करणारा कायदा लवकरच करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली. दूध भेसळ प्रकरणातील दोषींना तीन वर्षांचा कारावास होणार आहे.

वणवा देशभर पसरेल: शरद पवारांचा इशारा

मुंबई, (प्रतिनिधी):-भाजपा सरकारने घोषणा खूप केल्या, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. यामुळेच उपेक्षित वर्ग आज मुंबईत चालत आला. आता राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.

'लाल वादळा'ची ताकद बघून सरकार खडबडून जागं झालं -अजित पवार

मुंबई, (प्रतिनिधी):-लाल वादळ मुंबईत धडकल्यानंतर सरकार खडबडून जागं झाली. त्यानंतर समिती स्थापन करून आज सरकारची नौटंकी सुरू आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली.

खा. पूनम महाजन माफी मागा: विरोधक

नवी दिल्ली-व्रतसेवा राज्यासह देशात चर्चेत असलेल्या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चबद्दल भारतीय जनता पक्षाच्या खासदार पुनम महाजन यांनी मुक्ताफळं उधळली आहेत

रक्ताळलेल्या पायांनी लाखो शेतकर्‍यांचा आक्रोश

मुंबई, (प्रतिनिधी):- जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाने आज मुंबईतील सत्ताधार्‍यांना घाम फोडला. शेकडो मैल अनवानी पायाने मुंबईत दाखल झालेल्या शेतकर्‍यांच्या आक्रोशाने मुंबईच्या नव्हे तर राज्याच्या कानठळ्या बसल्या. रक्ताळलेल्या पायांनी लाखो शेतकर्‍यांनी आझाद मैदानावर एका नव्या क्रांतीचा बिगुल वाजवला. मुंबईच्या दिशेने मोर्चा कुच करत असतांनाही देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्र्यांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली.

किसान मोर्चाशी सरकारची चर्चेची तयारी, लेखी आश्नासनाशिवाय माघार नाही- आंदोलक

मुंबई- विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने शेतकरी व आदिवासींचा नाशिक येथून काढलेला लाँग मार्च आज मुंबईत दाखल झाला. शनिवारी रात्री ठाण्यात मुक्काम केल्यानंतर 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. किसान मोर्चा आज मुंबईत मुक्काम ठोकेल तर सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे. जोपर्यंत आपल्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत घेराव कायम ठेवण्याची भूमिका मोर्चेक-यांनी आखली आहे. किसान सभेचे डाॅ.

किसान मोर्चासोबत मंत्री गिरीश महाजन चर्चा करणार

मुंबई , (प्रतिनिधी):- मजल-दरमजल करत नाशिकमधून निघालेला शेतकर्‍यांचा भव्य मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. ठाण्यातील मुक्कामानंतर हा मोर्चा उद्या, म्हणजे १२ तारखेला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.

Pages