लाइव न्यूज़
Add new comment
‘मोदी’मुक्त भारतासाठी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र यावं; राज ठाकरेंचे आवाहन
Beed Citizen | Updated: March 18, 2018 - 10:35pm

मुंबई ,( प्रतिनिधी):-गुजरात दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी माझ्यासमोर चांगलं चित्र उभा केलं, मात्र, ते सगळं खोटं होत. आता मोदींचा खरा चेहरा माझ्या समोर आला आहे. २०१९ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज, मोदी मुक्त भारत व्हायला हवा. मोदींच्या परदेश दौऱ्यातून एकही रुपया भारतात आला नाही. मोदी हे केवळ खोटे बोलणारे नेते आहेत. ते जर पुन्हा सत्तेत आले तर देशाची आणखी वाट लागेल. त्यामुळे आता मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते शिवाजी पार्कवरील मनसेच्या ‘पाडवा मेळाव्या’त बोलत होते.