Beed Citizen | Updated: February 10, 2018 - 3:24pm
जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील रावेर न्यायालयाने बजावलेलं पकड वॉरंट अखेर रद्द करण्यात आलंय.
Beed Citizen | Updated: February 10, 2018 - 3:04pm
सांगली (प्रतिनिधी) मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन भेटवस्तू द्यावी, असा विचित्र सल्ला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे. मंत्रिपदावरील एका जबाबदार व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वीही चंद्रकांत पाटील हे आपल्या वक्तव्यांमुळे अडचणीत आले आहेत.
औरंगाबाद - सार्वजनिक ठिकाणी महिलांवर बेजबाबदार वक्तव्य करणे आता चांगलेच महाग पडणार आहे. सामाजिक माध्यमातून महिलांची बदनामीचे सर्व प्रकार रोखण्यासाठी राज्य महिला आयोग लवकरच कडक व धोरणात्मक सूचनांचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.
मुंबई : 'नीट'च्या परीक्षेची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे. ही परीक्षा यंदा 6 मे रोजी होणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.
नीटसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया कालपासूनच सुरु झाली आहे. 9 मार्चला रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे. रविवार 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 'नीट' परीक्षा होईल. सीबीएसईतर्फे दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते.
मुंबई-मुंबईत मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली.हर्षल रावते असे या तरूणाचे नाव असून तो 44 वर्षाचा आहे.मेहुणीच्या हत्येप्रकरणी तो औरंगाबादमधील पैठण येथे शिक्षा भोगत होता.मागील 30 दिवसांपासून पॅरोलवर तो होता.सध्या तो मुंबईत चेंबूर येथे आई-वडिलांकडे आला होता.30 दिवसाची संचित रजेनंतर पैठण कारागृहात हजर होण्याचा त्याचा आज शेवटचा दिवस होता.
मुंबई:राज्यातही सातवा वेतन आयोग;पगार २५ टक्क्यांपर्यंत वाढणार
गेल्या वर्षी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लवकरच लागू केला जाईल अशी घोषणा केली होती.परंतु एक वर्ष होऊन गेले तरी सातवा वेतन आयोग लागू झाला नाही.सरकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनेही केली.अखेर या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याची घोषणा केली.
मुंबई- मुंबईत मंत्रालयावरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हर्षल रावते असे या तरूणाचे नाव असून तो 30 ते 35 या वयोगटातील आहे. त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली जात नाहीये.
२०१९ पर्यंत रेल्वे धावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू_
बीड दि. ०८ ----- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे नगर- बीड- परळी रेल्वेमार्गासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात ४२५ कोटी रूपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरून २०१९ पर्यंत रेल्वे धावण्याचे जिल्हा वासियांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंडे भगिनी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने रेल्वेचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
मुंबई : अहमदनगर येथील अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात येत होता. न्याय न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले.मंत्रालयासमोर अविनाश शेटे याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार राखीव प्रवर्गातून सदस्यत्वासाठी तसेच सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जातप्रमाणपत्र पडताळणी सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्याच्या आत जातप्रमाणपत्र पडताळणी सादर करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली. ही मुदत ३० जून २०१९ पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी लागू करण्यात येणार आहे.
औरंगाबाद- राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बुधवारी (दि. ७) दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी तसेच शुक्रवारी ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मुंबई- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जर जाणीवपूर्वक अडकवले असल्यास त्यांना न्याय मिळणार नाही असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. दरम्यान, खडसेंनी असं वक्तव्य करून आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिल्याचे मानले जात आहे.
पुणे: कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे.
मुंबई (प्रतिनिधी) सत्तेत सहभागी असुनही शिवसेनेने भाजपविरूध्द सवता सुभा घेण्याची भुमिका जाहीर केलेली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणूका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमधील आघाडीच्या हालचाली वाढल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गुप्तगु सुरू झाली आहे.