मेहुणीच्या हत्येप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगणा-या गुन्हेगाराची मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या
मुंबई-मुंबईत मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली.हर्षल रावते असे या तरूणाचे नाव असून तो 44 वर्षाचा आहे.मेहुणीच्या हत्येप्रकरणी तो औरंगाबादमधील पैठण येथे शिक्षा भोगत होता.मागील 30 दिवसांपासून पॅरोलवर तो होता.सध्या तो मुंबईत चेंबूर येथे आई-वडिलांकडे आला होता.30 दिवसाची संचित रजेनंतर पैठण कारागृहात हजर होण्याचा त्याचा आज शेवटचा दिवस होता. 2014 पासून हर्षल पैठण खुल्या कारागृहात 302 गुन्ह्याखाली शिक्षा भोगत होता,अशी माहिती पैठण खुले कारागृहाचे अधिक्षक सचिन साळवी यांनी दिली आहे.दरम्यान,हर्षल याच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली असून,शिक्षा भोगत असताना नैराश्य आल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यात म्हटल्याचे समोर येत आहे.
दरम्यान,घटनास्थळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,अजित पवार,जयंत पाटील,नवाब मलिक,राधाकृष्ण विखे-पाटील,मंत्री विनोद तावडे आदींनी धाव घेतली.घटनास्थळी उपस्थित असलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की,हर्षल रावते हा गृह विभागात कोणत्यातरी कामासाठी आला होता.मात्र काही कळायच्या आताच त्याने मंत्रालयावरून उडी मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
मंत्रालयात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नैराश्यातून मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.मंत्रालयात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नैराश्यातून मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.मागच्या पंधरवड्यात धुळ्याचे धर्मा पाटील,सोलापूरचे सदाशिव घावते यांची प्रकरणे ताजी अाहेत.त्यात बुधवारी अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाची भर पडली.नेवासे तालुक्यातील अविनाश शेटे(३३)या सुशिक्षित बेराेजगार तरुणाने नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशदारी अंगावर राॅकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला.बुधवारच्या घटनेला 24 तास होत नाहीत तोच हर्षल रावते नावाच्या तरूणाने मंत्रालयावरून थेट उडी मारली आहे.
Add new comment