मुंबई, (प्रतिनिधी):- दोन वर्षांत ७२ हजार सरकारी नोकर्या देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘बोलायचे आणि विसरून जायचे. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते,’ असं सुनावतानाच, ’पहिल्या वर्षी ३६ हजार जागा भराल, तेव्हा त्या लोकांची यादीही जाहीर करा,’ असं आव्हान उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.