लाइव न्यूज़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रकाश आंबेडकर यांना चर्चेसाठी निमंत्रण काही गोंधळ झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहील
Beed Citizen | Updated: March 26, 2018 - 3:11pm
मुंबई, (प्रतिनिधी):- मुंबईत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करा, या मागणीसाठी आज मुंबईत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो अनुयायी मुंबईत धडकणार असून या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. भायखळा येथून एल्गार मोर्चा निघणार होता. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ सर्व कार्यकर्ते जमले.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करून येताना आंबेडकरी अनुयायांवर दगडफेक झाली. त्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला. या हिंसाचारामागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांची चिथावणी असल्याचे समोर आले. या प्रकरणी हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांना अटक केली असली तरी संभाजी भिडे यांना अद्याप अटक झालेली नाही. संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. २६ मार्चपर्यंत संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी. ही मागणी पूर्ण झाली नाही तर २६ मार्चलाच मुंबईवर मोर्चा काढू आणि भिडे यांच्या अटकेपर्यंत मुंबई ताब्यात घेऊ असाही इशारा प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात दिला होता.
Add new comment