महाराष्ट्र

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण: मिलिंद एकबोटेंना जामीन

मुंबई, (प्रतिनिधी):-भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांचा जामीनअर्ज गुरुवारी मंजूर झाला आहे. एकबोटे यांना ऍट्रोसिटीच्या गुन्ह्यात यापूर्वीच जामीन मंजूर झाला असून दुसर्‍या प्रकरणातही जामीन मिळाल्याने त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ज्यांची दुकानं बंदी झाली ते जातीय तणाव निर्माण करतात : गडकरी

नांदेड, (प्रतिनिधी):- नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर अनेकांची दुकानं बंद झाली. त्यामुळेच काही लोक समाजात जातीय तणाव निर्माण करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. ते आज नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

विनायक मेटेंसाठी २० लाखांची कार खरेदी

मुंबई, (प्रतिनिधी):- शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यासाठी राज्यसरकार २० लाखाची कार खरेदी करणार आहे. सरकारवर ४.३३ लाख कोटींचं कर्ज असल्याचं सांगणार्‍या राज्यसरकारने एवढी महागडी कार खरेदी करण्यास हिरवा कंदिल दर्शविल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

विरोधकांचा निषेध नोंदविण्यासाठी पंतप्रधानांनाही उद्या उपवास

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- विरोधी पक्षांनी गोंधळ व गदारोळ करून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्ष उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. या देशव्यापी उपोषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सहभागी होणार आहेत. 

भाजप आमदार कर्डिले यांना अटक

नगर, (प्रतिनिधी):- शिवसेना पदाधिकार्‍यांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. कर्डिले यांची अटक केवळ तोडफोड प्रकरणाशी संबंधित असून त्याचा या हत्येशी काहीही संबंध नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. 

मी एका पक्षात आहे, त्याचे काही प्रोटोकॉल पाळावे लागतात- ना.पंकजाताई

ठाणे, (प्रतिनिधी):- भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील बीकेसीत महामेळावा आयोजित करण्यात आला होता. तेथील बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा ङ्गोटो नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. किंबहुना, काही कार्यकर्त्यांनी महामेळाव्यातच घोषणाबाजी केली. यावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे.

केडगाव खुन प्रकरणाच्या निषेधार्थ जामखेड कडकडीत बंद

जामखेड (प्रतिनिधी):- अहमदनगर  येथील केडगावमधील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या हत्याकांड प्रकरणी आज दि ८ रोजी जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यांनी जामखेड बंद चे अवाहन करुन या घटनेतील मुख्य आरोपींना अटक करावी व या घटनेत हलगर्जीपणा करणारया संबंधित पोलिस अधिकारयांवर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन जामखेड शहरातून निषेध फेरी काढून तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिले.

नगरमध्ये तणाव, शिवसेनेचे शहर उपप्रमुखासह एकाची हत्या, राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक

नगर- केडगाव उपनगरातील शाहूनगर भागातील सुवर्णनगर येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय केशव कोतकर व वसंत आनंदा ठुबे यांच्यासह एकाच गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून तसेच कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. या दुहेरी हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम अरुण जगताप यांना पोलिसांनी रविवारी पहाटे ३ वाजता अटक केली.

नगरमध्ये तणाव, पालकमंत्री राम शिंदे थीम पार्कच्या उद्घाटनाला

शिर्डी, (प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यात तणावाचं वातावरण असताना पालकमंत्री राम शिंदे मात्र एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. शिर्डीत मालपाणींच्या थीम पार्कच्या उद्घाटनासाठी त्यांनी हजेरी लावली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत.

बाबा सिद्दीकींवर ईडीची मोठी कारवाई, 33 फ्लॅट्स जप्त

मुंबई, (प्रतिनिधी):-  एसआरए घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकींवर ईडीने मोठी कारवाई केली आहे.

'टायगर' तुरुंगाबाहेर, सलमान खानला जामीन मंजूर

जोधपूर, (वृत्तसंस्था):- :  सलमान खानला जामीन मंजूर झालाय. टायगर अखेर तुरुंगाबाहेर आलाय. जोधपूर कोर्टानं सलमानला दिलासा दिलाय. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. 7 मे ला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजेरी लावावी लागणार आहे. सलमान खान संध्याकाळपर्यंत तुरुंगाबाहेर येईल.

राहुल गांधी पवारांनी इंजेक्शन दिल्यानंतरच बोलतात: अमित शहा

मुंबई (प्रतिनिधी):: काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजेक्शन दिल्यावरच बोलतात. आमच्याकडे राहुल गांधी तीन वर्षांचा हिशेब मागतात. पण त्यांच्या चार पिढ्यांनी काय केले? हे आधी सांगावे, असा हल्लाबोल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला.

सलमानचा आजचा मुक्काम जेलमध्येच, जामीन अर्जावर उद्या निर्णय

जोधपूर, व्रतसेवा : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला आज दिलासा मिळू शकला नाही. सलमानच्या जामीन अर्जाचा निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवण्यात आलाय. त्यामुळे सलमान खानचा आजचा मुक्काम हा जेलमध्येच असणार आहे.

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला ५ वर्षाची शिक्षा

जोधपुर, (वृत्तसंस्था):-काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने धक्का दिला. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैङ्ग अली खान यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार : मिलिंद एकबोटेंना दुसर्‍या गुन्ह्यात ४ दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई, (प्रतिनिदी):-भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील एक आरोपी मिलिंद एकबोटे यांना कोर्टाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. या हिंसाचार प्रकरणातील दुसर्‍या एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या येरवडा कारागृहात असलेल्या एकबोटेंना चौकशीसाठी शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

पेट्रोल दरवाढीवर राज ठाकरेंनी ‘पेटवली काडी’

मुंबई, (प्रतिनिधी):-पेट्रोल आणि डिझेलची गेल्या चार वर्षांतील उच्चांकी दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना दरवाढीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हाच मुद्दा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!

मुंबई, (प्रतिनिधी):- उन्हाच्या झळा सहन करणार्‍या नागरिकांसह, बळीराजासाठी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने गुड न्यूज दिली आहे. यंदा देशभरात  समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वार्‍याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Pages