लाइव न्यूज़
विरोधकांचा निषेध नोंदविण्यासाठी पंतप्रधानांनाही उद्या उपवास
Beed Citizen | Updated: April 11, 2018 - 3:15pm
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- विरोधी पक्षांनी गोंधळ व गदारोळ करून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्ष उद्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहे. या देशव्यापी उपोषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी हे दैनंदिन कार्यात व्यग्र राहूनच उपवास करणार असून यादरम्यान ते नेहमीप्रमाणे फायलींचा निपटारा करतील, तसंच, अधिकारी व लोकांच्या भेटीगाठी घेतील. तामिळनाडू येथील कांचीपुरममध्ये भरणार्या संरक्षणविषयक प्रदर्शनाचं उद्घाटनही मोदी करतील, असं सूत्रांनी सांगितलं. भाजपाध्यक्ष अमित शहा हे कर्नाटकातील हुबळी येथे उपोषणाला बसणार आहेत. कर्नाटक राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. हे लक्षात घेऊनच शहा यांनी उपोषणस्थळ निवडल्याचं बोललं जातं.
Add new comment