Add new comment

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला ५ वर्षाची शिक्षा

जोधपुर, (वृत्तसंस्था):-काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने धक्का दिला. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैङ्ग अली खान यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले. त्यापूर्वी सलमान खान, नीलम, सोनाली बेंद्रे, सैङ्ग अली खान, तब्बू हे सेलिब्रिटीही न्यायालयात पोहोचले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.