Add new comment

मी एका पक्षात आहे, त्याचे काही प्रोटोकॉल पाळावे लागतात- ना.पंकजाताई

ठाणे, (प्रतिनिधी):- भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील बीकेसीत महामेळावा आयोजित करण्यात आला होता. तेथील बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा ङ्गोटो नसल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. किंबहुना, काही कार्यकर्त्यांनी महामेळाव्यातच घोषणाबाजी केली. यावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे.
ते कार्यकर्ते ङ्गक्त बीडचे नव्हते. त्यांचे चेहरे माझ्या ओळखीचे नव्हते. त्यांच्या हातात मुंडे साहेबांचे पोस्टर होते आणि ते काय म्हणत होते, हे मला स्टेजवरुन नीट ऐकूदेखील येत नव्हतं. पण मंचावरील सर्व नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. त्यामुळे काही वाद नाही., असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
तसेच, मला स्वतःला दुख झालं की नाही, यापेक्षा मी एका पक्षात आहे, त्याचे काही प्रोटोकॉल आहेत, जे पाळावे लागतात. त्यामुळे मी पोस्टर वादवार काही बोलू शकत नाही., असेही त्या पुढे म्हणाल्या.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.