लाइव न्यूज़
विनायक मेटेंसाठी २० लाखांची कार खरेदी
Beed Citizen | Updated: April 19, 2018 - 3:33pm
मुंबई, (प्रतिनिधी):- शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यासाठी राज्यसरकार २० लाखाची कार खरेदी करणार आहे. सरकारवर ४.३३ लाख कोटींचं कर्ज असल्याचं सांगणार्या राज्यसरकारने एवढी महागडी कार खरेदी करण्यास हिरवा कंदिल दर्शविल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारीच कार खरेदीसाठी ऑर्डर काढली आहे. दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार खरेदीच्या निर्णयाला विरोध केला होता. शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षांसाठी कार खरेदी करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं सांगत मुनगंटीवार यांनी हा विरोध दर्शविला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून कार खरेदीची ऑर्डर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे ही कार खरेदी केली जाणार असून नंतर ती मेटेंना हस्तांतरीत केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. नवीन कार खरेदी करण्यात आली तरी त्यासाठी ड्रायव्हरची पोस्ट भरण्यात येणार नाही. विभागाकडूनच ड्रायव्हर पुरविला जाणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्ट केलं आहे.
Add new comment