Add new comment

सलमानच्या जामीनावर सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांची बदली

जयपूर, (वृत्तसंस्था):- काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खानच्या जामीनावरचं संकट कायम आहे. कारण दोन रात्री जेलमध्ये काढलेल्या सलमानच्या जामीनावर आज सुनावणी होणं अपेक्षित आहे. मात्र या जामीनावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली झाली आहे. न्यायाधीश रवींद्र जोशी यांच्यासह ८७ न्यायाधीशांची बदली झाली आहे. ही नियमित बदली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सलमानच्या जामीनावरील सुनावणीचं संकट कायम आहे.
..तर सलमानला जामीन
केवळ निर्णय बाकी असल्यामुळे एखादे न्यायाधीश बदलीनंतरही जामीन अर्जावर निर्णय देऊ शकतात. मात्र त्यांना ते बंधनकारक नसतं. काही न्यायाधीश सुनावणी घेतात, तर बहुसंख्य न्यायाधीश बदलीनंतर निर्णय देत नाहीत. त्यामुळे न्यायाधीश रवींद्र जोशी हे आज सलमानच्या जामीनाबाबत कोणता निर्णय घेतात, हे त्यांच्यावरच अवलंबून आहे.

.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.