महाराष्ट्र

पतंगराव कदम यांचे पार्थिव भारती विद्यापीठात, अंत्यदर्शनासाठी गर्दी

पुणे, (प्रतिनिधी):-ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव पुण्यातील सिंहगड बंगला या ठिकाणी ठेवण्यात आले होते. पतंगराव कदम यांचे पार्थिव आता भारती विद्यापीठ धनकवडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पुण्यातील सिंहगड या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली होती. ती काही वेळापूर्वी भारती विद्यापीठ या ठिकाणी पोहचली आहे.  साधारण एक ते दीड तासासाठी या ठिकाणी पतंगराव कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

बक्षी समितीच्या अहवालानंतरच सातवा वेतन आयोग-अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार .

मुंबई (प्रतिनिधी)राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. बक्षी समितीच्या अहवालानंतरच सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

…आणि दिवाकर रावतेंनी मध्यरात्री केली प्रवाशांची सुटका

परळी । प्रतिनिधी

एक प्रवासी मध्यरात्री संकटात अडकतो. अडचणीत सापडलेला तो व्यक्ती मंत्र्यांना मदतीसाठी फोन करतो. मध्यरात्री मंत्रीमहोदय त्याचा फोन घेतात, आणि अवघ्या २० मिनिटात त्याची अडचणीत सुटका होते. हा कोणत्या चित्रपटामधला प्रसंग नाही, कोणती फँटसी नाही तर परळीच्या अनिरुद्ध जोशी यांना आलेला अनुभव आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे जोशींची अडचणीतून तात्काळ सुटका झाली. जोशी यांनी हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
------------------------
काय घडला प्रसंग ?

पोलीस पाटलांच्या मानधन वाढी बाबत दोन महिन्यात अहवाल प्राप्त करून निर्णय; 2012 पासुनचे प्रलंबित पुरस्कारही दोन महिन्यात देणार

धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर गृहराज्यमंत्र्यांचे उत्तर
————————————————————
मुंबई दि.08...राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे बाबत अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीकडुन दोन महिन्याच्या आत अहवाल प्राप्त करून घेवुन मानधन वाढीबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन विधान परिषदेत आज गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला आहे, योग्य वेळी जाहीर करु; संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई-शिवसेनेचा सत्तेतुन बाहेर पडण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही योग्य वेळी जाहीर करु, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एनडीएतील घटकपक्ष टीडीपीने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबादमधील शाळा गुरुवारी बंद

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावरुन आंदोलन पेटल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी संतप्त नागरिकांनी कचऱ्याच्या प्रश्नावर बुधवारी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामध्ये ९ पोलीस आणि काही नागरिक जखमी झालेत. त्यांच्यावर शहरातील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद मध्ये कचरा प्रश्न पेटला, पोलिसांकडून हवेत गोळीबार

पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख जखमी ;पोलीसाकडुन लाठीमार
————————————————————————————
औरंगाबाद प्रतिनिधी ।

औरंगाबाद कचरा टाकण्यावरून आंदोलन पेटले असून आंदोलक आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील मिटमिटा या ठिकाणी नागरिकांनी आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांचा उद्रेक पाहून त्यांना रोखण्यासाठी
पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधूराच्या कांड्या फोडल्या. तसेच संतप्त जमावाला रोखण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. यामध्ये शाळेंच्या बसेस अडकल्या आहेत. शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत.

लाच घेताना जीएसटी अधिकारी अटकेत; उस्मानाबादेत कारवाई

उस्मानाबाद-व्यापाऱ्याकडून १ लाखाची लाच घेताना उस्मानाबादेत जीएसटी कार्यालयाचा अधिकारी बलभीम आगरकरला एसीबीने मंगळवारी अटक केली. आगरकरने एका नोंदणीकृत व्यापाऱ्याला २०१५-१६ या वर्षाच्या व्हॅटप्रकरणी नोटीस बजावली होती.

भुजबळांच्या उपचारावरून खडाजंगी; मंत्री दिवाकर रावतेंच्या वक्तव्यावर अाक्षेप

मुंबई-बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

खर्डा येथे रंगपंचमीच्या दिवशीच रक्तरंजित राडा दोन गटात तुफान दगडफेक; आठ जण जखमी

जामखेड, (प्रतिनिधी):-रंगपंचमीच्या दिवशीच खर्डा येथील बस स्थानकासमोर पुर्व वैमनस्यातुन दोन गटात झालेल्या तुफान हाणामारी व दगडफेकीत अनेक दुचाकी व चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरोड्याच्या तयारीतील बारा जण पकडले अहमदनगरमधील शेवगाव शिवारात कारवाई; बाराही जण बीड जिल्ह्यातील रहिवाशी

बीड, (प्रतिनिधी):- दरोडा टाकण्याच्या उद्देशाने रस्त्याच्याकडेला दबा धरुन बसलेल्या बारा जणांना गजाआड करण्यात शेवगाव (जि.अहमदनगर) पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १८ जण पकडले असुन त्यातील १२ जण बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून लाल मिरची पुड, लोखंडी गज, तलवार, सुती दोरी,  लोखंडी पाईप असे हत्यार जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी शेवगाव, पाथर्डी, शनिशिंगणापुर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी अाता बीडसह राज्यात १३२ पोलीस ठाणे

बीड। प्रतिनिधी
---------------------------------------
राज्यात वीज चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे या घटनांना आळा घालण्याबरोबरच वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

गारपीट होण्याचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने मागे घेतला

येत्या बुधवारी मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता केंद्रीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली होती. मात्र आता हा इशारा मागे घेण्यात आला आहे. राज्यात गारपीट होणार नाही असं आता हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोदी, चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

मुंबई व्रतसेवा; पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात विशेष PMLA न्यायालयाने अजामीनपात्र  अटक वॉरंट

नवाझुद्दीन 'मातोश्री'वर... उद्धव ठाकरेंची घेतली भेट!

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट घेतली. सुमारे दीड तास नवाजुद्दीन सिद्धिकी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

एमपीएससी संदर्भातील याचिका हायकोर्टाने निकाली काढली!

मुंबई (वृत्तसेवा) मुंबई उच्च न्यायालयाने एमपीएससी परीक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका निकाली काढली आहे. या संदर्भातील प्रकरणं महाराष्ट्र डमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे नेण्याची निर्देश देत हायकोर्टाने याचिका निकाली काढली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत चझडउ निवड प्रक्रियेवरची स्थगिती हायकोर्टाने कायम ठेवली आहे.

Pages