महाराष्ट्र

१५० कोटींच्या निविदा उघडताच धमाका!

शहरातील तब्बल ५२ रस्ते सिमेंटने गुळगुळीत करण्यासाठी महापालिकेत निविदा प्रक्रिया सुरू होती. सोमवारी निविदा उघडताच जोरदार धमाका झाला. पुण्याच्या एका कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय रकमेपेक्षाही कमी दराने निविदा भरून मोठ-मोठ्या कंत्राटदारांना धोबीपछाड दिली आहे. शहरातील सर्व कंत्राटदारांनी मिळून रिंग पद्धतीने निविदा २२ टक्के अधिक दराने दाखल केल्या होत्या. यातील एकालाही काम मिळालेले नाही, त्यामुळे कंत्राटदार आणि त्यांचे समर्थक प्रशासनावर दबाव टाकत आहेत.

भाविकांच्या वाहनास ट्रकची धडक 6 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

शेगाव-श्रीक्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सायंकाळी सव्वाचार वाजता भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात सहा भाविक ठार, तर आणखी तीन गंभीर जखमी झाले आहेत.

सुनील केंद्रेकरांना रूजू न होण्याचे आदेश, विभागीय आयुक्तपदी भापकर कायम

औरंगाबाद : राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश शनिवारी सरकारच्या वतीने काढण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त म्हणून क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण बदली आदेश निघून चोवीस तास उलटत नाहीत तोच केंद्रेकर यांना रूजू होऊ नका असा निरोप मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाला. त्यामुळे सोमवारी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेण्यासाठी सुनील केंद्रेकर आलेच नाहीत. 

​​मुंबई महापालिकेच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा , खरा डल्लामार समोर येईल; धनंजय मुंडे याचा सेनेवर पलटवार​​

मुंबई - मुंबई महापालिकेच्या मागील दहा वर्षांच्या कामाची कॅगमार्फत चौकशी करा, म्हणजे खरा डल्लामार कोण आहे? हे जनतेसमोर येईल असा पलटवार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

तर भस्मसात करण्याचीही आपल्यात धमक, एकनाथ खडसेंचा इशारा

जळगाव (वृत्तसेवा) गेल्या काही दिवसांपासून आपल्याच पक्षाविरोधात वक्तव्ये करत नाराजी दर्शवणारे भाजपाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षाला इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आयोजित लेवा पाटीदार समाजाच्या मेळाव्यात त्यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा बोलून दाखवली. लेवा पाटीदार-पटेल समाजात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात ती होती, हे इतिहासात डोकवल्यास लक्षात येते.

बालरंगभूमीचा आधारवड हरपला; सुधाताईंचं निधन

मुंबई (वृत्तसेवा) बालरंगभूमीच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यासाठी संपूर्ण जीवन वाहणार्‍या, ज्यांच्याशिवाय बालरंगभूमीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही आणि बालरंगभूमीच्या आधारवड अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचं आज मुंबईत निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. सुधा करमरकर यांनी ’मुंबई मराठी साहित्य संघा’च्या सहकार्याने १९५९ मध्ये ’लिटिल थिएटर’ची स्थापना केली होती. लिटिल थिएटरतर्फे ’मधुमंजिरी’ हे पहिलं बालनाट्य सादर केलं होतं. ते खूप गाजलं.

विरोधकांचे सत्तेत यायचे स्वप्न स्वप्नच राहणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष किंवा त्यांची आघाडी पुढची १० ते १५ वर्षे सत्तेत येणार नाही. त्यांनी सत्तेची स्वप्ने पाहणे सोडून द्यावे असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या दोन्ही पक्षांची अवस्था सत्तेशिवाय ‘जल बिन मछली’ अशी झाली आहे. सत्ता असताना या दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही आणि आता हल्ला बोल यात्रा काढत फिरत आहेत.याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या कारभारावर ताशेरे झाडले.

अन्याय झालाच असेल तर आमचे आम्ही पाहून घेऊ पंकजाताईंचे धनंजय मुंडेंना उत्तर

 पिंपरी चिंचवड, (प्रतिनिधी):- दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला असेल तर ते आमचं आम्ही पाहून घेऊ, असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.‘आठवणीतले गोपीनाथ मुंडे’ या कार्यक्रमाचं पिंपरीत आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘मी भावनिक नाही, पण भावनेने राजकारण करते’, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

कर्जमाफीप्रमाणे सरकारचे हमीभाव देण्याचे आश्वासनही ‘लबाडाघरचे आवतण’ – शरद पवार

भाजप सरकारने शेतमालाला हमीभाव देण्याचे जे आश्वासन दिले आहे, तो हमीभाव प्रत्यक्ष हातात मिळाल्याशिवाय यावर विश्वास ठेवू नये. ज्या प्रकारे कर्जमाफीसंबंधी ‘लबाडाघरचे आवतण’ ही म्हण मी मागे वापरली होती, तीच म्हण या आश्वासनालाही लागू होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष Sharad Pawar यांनी शेतकऱ्यांना सरकारच्या फसव्या धोरणांबाबत सावध केले. औरंगाबाद येथे हल्लाबोल आंदोलनाच्या मराठवाडा टप्प्याची सांगता सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

धनंजय देसाई याने दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

इंजिनीअर  मोहसीन शेख याच्या खुनाप्रकरणी अटकेत असलेल्या हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष  धनंजय देसाई याने दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

शरद पवारांच्या औरंगाबादेमधील सभेला अखेर पोलिसांकडून परवानगी

औरंगाबाद (वृत्तसेवा) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजच्या नियोजित सभेला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सभेला परवानगी दिली. त्यामुळे पवारांच्या सभेचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोळीबार प्रकरणी नाळवंडीच्या शिवाजी काकडेसह दोघे गजाआड

जामखेड (प्रतिनिधी) शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर डॉ.सादेक पठाण (रा.नाळवंडी ता.पाटोदा) यांच्यासह अन्य एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर शिवाजी काकडे यांच्यासह अन्य पाच ते सहा जणाविरूध्द जामखेड आणि अंमळनेर (ता.पाटोदा) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. घटनेनंतर ४८ तासामध्ये या प्रकरणातील शिवाजी काकडे याच्यासह भरत जगदाळे या दोघांना आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे.

श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई (वृत्तसेवा) प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना राज्यपाल सी.विद्यासागरराव यांच्या हस्ते आज मुंबई आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव-२०१८ च्या सांगता सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

मुंबईत शॉर्टसर्किटमुळे लोकलच्या दोन डब्यांना आग;सर्व प्रवासी सुखरुप

सीएसएमटीवरुन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या दोन डब्यांना अचानक आग लागल्याने लोकल दादर स्थानकांत थांबवण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामकच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यात आली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून कळते. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, धीम्या गतीच्या मार्गावरील लोकल फास्ट गतीच्या मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत.

आदेश आल्यास तासभरही सत्तेत राहणार नाही :-सुभाष देसाई

आदेश आल्यास तासभरही सत्तेत राहणार नाही :-सुभाष देसाई

शिवसेना २०१९ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे, ही काळ्या दगडावरील भगवी रेघ आहे. पक्षाने आदेश दिला की, शिवसेनेचे सर्व मंत्री एक दिवस काय, एक तासही सत्तेत न राहता राजीनामा देतील, असा विश्‍वास शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल गुरुवारी दिली*

ज्ञानविकास 'च्या विद्यार्थ्यनि अभ्यासले विधानभवन कामकाज मुंबई शैक्षणिक सहल दरम्यान उपक्रम

सिल्लोड बातमीदार--(अजय बाेराडे) अभ्यासक्रमाला असणाऱ्या बाबी जर विद्यार्थ्यांला प्रत्यक्ष कृतितुन शिकविल्या किंवा सबंधित ठिकानाला भेट देवून पाहणी केलि,अभ्यास केला तर विद्यार्थ्यना चांगल्या प्रकारे ज्ञान अवगत होऊ शकते या हेतुने येथील ज्ञानविकास विद्यालयच्या विद्यार्थ्यनि महाराष्ट्र राज्याच्या मुंबई येथील विधान भवन ला भेट दिली.

मिलिंद एकबोटे यांची जामीन हायकोर्टाने फेटाळली कोणत्याही क्षणी होणार अटक !

मुंबई: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेले अपील मुंबई हायकोर्टाने फेटाळले आहे. शिवाय सुप्रीम कोर्टात अपील करता यावे यासाठी आदेशाला स्थगिती देण्यास किंवा अटक होण्यापासून हंगामी संरक्षण देण्यासही हायकोर्टाचा नकार दिला आहे. यामुळे एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

Pages