ज्ञानविकास 'च्या विद्यार्थ्यनि अभ्यासले विधानभवन कामकाज मुंबई शैक्षणिक सहल दरम्यान उपक्रम
सिल्लोड बातमीदार--(अजय बाेराडे) अभ्यासक्रमाला असणाऱ्या बाबी जर विद्यार्थ्यांला प्रत्यक्ष कृतितुन शिकविल्या किंवा सबंधित ठिकानाला भेट देवून पाहणी केलि,अभ्यास केला तर विद्यार्थ्यना चांगल्या प्रकारे ज्ञान अवगत होऊ शकते या हेतुने येथील ज्ञानविकास विद्यालयच्या विद्यार्थ्यनि महाराष्ट्र राज्याच्या मुंबई येथील विधान भवन ला भेट दिली.
तेथे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांच्या सुचनेप्रमाने जनसंपर्क अधिकारी सुनील झोरे यांनी उपस्तिथ विद्यार्थ्याना विद्यानभवन अध्यक्ष ,राज्यपाल,प्रधान सचिव , मुख्यमंत्री ,मंत्री महोदय ,आमदार ,सर्व सचिव, पत्रकार, भेटिवर आलेल्या शैक्षणिक सहल विद्यार्थी आसन व्येवस्ता बाबत माहिती दिली.
तसेच कामकाज बाबत पधादीकारी यांचे कामकाज कश्या पद्धतीने चालते यांसह अनेक मुद्द्यांचे विस्तर स्पष्टीकरण श्री.झोरे यांनी करत मुलांच्या अनेक प्रश्नानचे निराकरण केले. सभागृहात निर्माण होणाऱ्या कायदे पद्धति,निधि मंजूरी,सार्वजानिक समश्या,लोकहिताचे निर्णय,आपत्कालीन समश्यावर करावयाच्या उपाय योजना यांसह विविध सरकारी योजना बाबत विद्यार्थ्यना माहिती दिली. भवन मधे जशे प्रश्नो उत्तर व चर्चेच्या माध्य मातुन कामकाज चालते त्या पद्धतीने विद्यार्थ्यना अनुभवयास मिळाले.
भवन बघुन विद्यार्थ्यांचे समाधान झाले.यावेळी विद्यार्थ्यना, शिक्षकाना 'विधान भवन कामकाज
पुस्तिका' भेट दिली.
यावेळी जनसंपर्क अधिकारी श्री झोरे सुनील , सुरक्षा अधिकारी पंडित, सहाय्यक सुरक्षा अधिकारी श्री जाधव, श्री वळसे यांसह विद्यालयाचे शिक्षक उपस्तिथ होते.
Add new comment