Add new comment

गोळीबार प्रकरणी नाळवंडीच्या शिवाजी काकडेसह दोघे गजाआड

जामखेड (प्रतिनिधी) शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर डॉ.सादेक पठाण (रा.नाळवंडी ता.पाटोदा) यांच्यासह अन्य एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर शिवाजी काकडे यांच्यासह अन्य पाच ते सहा जणाविरूध्द जामखेड आणि अंमळनेर (ता.पाटोदा) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. घटनेनंतर ४८ तासामध्ये या प्रकरणातील शिवाजी काकडे याच्यासह भरत जगदाळे या दोघांना आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे.
बीड जिल्ह्यातील नाळवंडी (ता.पाटोदा) येथील ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरून अज्ञात हल्लेखोरांनी पाटोद्याजवळ जानुलाल पठाण तर जामखेडमध्ये त्यांचा मुलगा डॉ.सादेक पठाण, कय्युम शेख यांच्यावर हल्ला केला होता. जामखेडमध्ये झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली होती. याप्रकरणात पाच ते सहा जणाविरूध्द गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गतीने शोध मोहिम राबवत शिवाजी काकडे (रा.नाळवंडी ता.पाटोदा) आणि भरत जगदाळे (जगदाळे वस्ती, जामखेड) या दोघांना आज पहाटे गजाआड केले. दुपारी उशिरा दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.