Add new comment

भाविकांच्या वाहनास ट्रकची धडक 6 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी

शेगाव-श्रीक्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यानजीक सायंकाळी सव्वाचार वाजता भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात सहा भाविक ठार, तर आणखी तीन गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

भाविक पातूर-बाळापूर मार्गावरील बाघ फाट्यावर आले. यावेळी मागून आलेल्या ट्रकने (आर. जे. 13 जी. सी. 0782) पायदळ दिंडीसोबत असलेल्या तीन चाकी वाहनास (एम. एच. 37, बी. 368) धडक दिली. त्यानंतर हा ट्रक भाविकांवर उलटला. ट्रकमधील सरकीच्या पोत्यांखाली दबल्याने भाविक जागीच ठार झाले, तर तीन गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये काशीनाथ चंद्रभान कापसे, रमेश धनाजी कापसे, लिला कापसे, रामजी काकडे ( सर्व रा. उमरा-कापसे, जि. वाशीम) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये सरजूबाई कापसे, लोडबाई बळीराम कापसे व आणखी एका मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन भाविकांना सरकीच्या पोत्यांखालून बाहेर काढले. बाळापूर पोलिसांनीही घटनास्थळाला भेट देऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.