अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन करण्यात आ.मेटे यांचे मोलाचे योगदान- मुख्यमंत्री

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास योजनेतून नवउद्योजक घडावेत- मुख्यमंञी फडणवीस

मुंबई-
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाची आज राज्य सरकारच्या वतीने सुुरवात करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास मंत्री संभाजीराव निलंगेकर, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायक मेटे, आ.नरेंद्र पाटील, आ.प्रसाद लाड, कौशल्य विकास विभागाचे सचिन असिन गुप्ता यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे महामंडळ स्थापन करण्यात आ.विनायकराव मेटे यांचे मोलाचे योगदान असल्याचाही उच्चार केला. 

राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्या अनुसरून काही योजना जाहीर केल्या होत्या. विशेषत: मराठा समाजाचे विराट स्वरूपात निघालेले मोर्चे निघाले आणि त्या मोर्चामधून काही अपेक्षा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. दुर्दैवाने ही बाब न्यायप्रविष्ट आहे. त्यातही राज्य सरकार पूर्ण ताकदीनिशी आणि आवश्यक त्या सगळ्या बाबींची पूर्तता करत आहे. त्या राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करणे असेल हे सर्व काम राज्य सरकार करत आहे. आरक्षण मिळणे हे गरजेचे आहेच परंतू आरक्षणाने नौकर्‍या मिळतील परंतू त्या पलिकडे जावून विचार करणे गरजेचे आहे आणि म्हणून या समाजातील तरूणाईला रोजगार देण्यासंबंधीची उपाययोजना करावी लागेल. यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. त्यासाठी राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

रोजगार महत्वाचा आहे यातून नवउद्योजक तयार करणे हा सरकारचा मानस आहे. जो पर्यंत शेतीतील कौशल्य विकसित होत नाहीत. तोपर्यंत समाजाचे आर्थिक मागासपण दूर होणार नाही. म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेतून मराठा समाजातील तरूणांना दहा लाखापर्यंतची कर्जावर व्याज माफी दिली जाणार आहे. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेतून गट कर्जासाठी पन्नास लाख मर्यादा करण्यात आली आहे. या योजनेत देखील व्याज परतावा मिळणार आहेत.

मराठा समाजाने मोर्चाच्या माध्यमातून विराट रूपदर्शन दिले होते.ज्या प्रमाणे श्रीकृष्णाच्या विराट रूपासमोर सर्वच नतमस्तक होतात. त्याचप्रमाणे समाजाच्या विराट रूपासमोर नतमस्तक होवून आणि त्यांच्या भावना समजून त्या भावनांचा आदर करत आम्ही काम करत आहोत. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ स्थापन करण्यात आ.विनायक मेटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते असे प्रतिपादन ना.देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.
-----

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.