लाइव न्यूज़
पतंगराव कदम यांचे पार्थिव भारती विद्यापीठात, अंत्यदर्शनासाठी गर्दी
Beed Citizen | Updated: March 10, 2018 - 2:59pm
पुणे, (प्रतिनिधी):-ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव पुण्यातील सिंहगड बंगला या ठिकाणी ठेवण्यात आले होते. पतंगराव कदम यांचे पार्थिव आता भारती विद्यापीठ धनकवडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पुण्यातील सिंहगड या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघाली होती. ती काही वेळापूर्वी भारती विद्यापीठ या ठिकाणी पोहचली आहे. साधारण एक ते दीड तासासाठी या ठिकाणी पतंगराव कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वांगी येथे असलेल्या सोनहिरा साखर कारखना येथे दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पुण्यातील सिंहगड या निवासस्थानी पतंगराव कदम यांचे पार्थिव आणण्यात आल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी खासदार सुरेश कलमाडी, खासदार श्रीरंग बारणे यांनी या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. आमदार प्रणिती शिंदे, डॉ. के. एच. संचेती, डॉ. विश्वनाथ कराड, बुधाजीराव मुळीक, विद्या येरवडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, विठ्ठल मणियार, आमदार जगदीश मुळीक, अभय छाजेड, अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांनी पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली होती. तसेच अनेक कार्यकर्त्यांचीही या ठिकाणी गर्दी जमलेली आहे.
Add new comment