लाइव न्यूज़
मोदी, चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
Beed Citizen | Updated: March 3, 2018 - 4:47pm
मुंबई व्रतसेवा; पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात विशेष PMLA न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करतानाच, या दोघांची संपत्ती जप्त करण्याचा विचार युद्धपातळीवर सुरू आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून बुधवारी २८ फेब्रुवारीला ईडीने या दोघांचे नियंत्रण असलेल्या ४१ स्थावर मालमत्तांवर टाच आणली आहे. या संपत्तीचे बाजारमूल्य १२१७.२० कोटी रुपये इतकी आहे. ही संपत्ती अनेक राज्यांमध्ये विखुरलेली आहे.
Add new comment