Add new comment

'टायगर' तुरुंगाबाहेर, सलमान खानला जामीन मंजूर

जोधपूर, (वृत्तसंस्था):- :  सलमान खानला जामीन मंजूर झालाय. टायगर अखेर तुरुंगाबाहेर आलाय. जोधपूर कोर्टानं सलमानला दिलासा दिलाय. 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. 7 मे ला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजेरी लावावी लागणार आहे. सलमान खान संध्याकाळपर्यंत तुरुंगाबाहेर येईल. एक महिना त्याला देशाबाहेर जाता येणार नाही.

वीस वर्ष जुन्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवत पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.