Add new comment
केडगाव खुन प्रकरणाच्या निषेधार्थ जामखेड कडकडीत बंद
जामखेड (प्रतिनिधी):- अहमदनगर येथील केडगावमधील शिवसेना पदाधिकार्यांच्या हत्याकांड प्रकरणी आज दि ८ रोजी जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यांनी जामखेड बंद चे अवाहन करुन या घटनेतील मुख्य आरोपींना अटक करावी व या घटनेत हलगर्जीपणा करणारया संबंधित पोलिस अधिकारयांवर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन जामखेड शहरातून निषेध फेरी काढून तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, तालूका उपप्रमुख राजू पाचारे , मोहन जाधव, राहूल उगले दत्ता शिंदे, हर्षद मूळे, हिंदूराज मुळे, यूवा नेते लक्ष्मण कानडे, संदिप भोरे, संभाजी बोलभट, सचिन कानडे, नितीन खेत्रे,खंडू कवादे, गणेश कोळपकर, जालिंदर काळे, राजू झिंजूरके, बापुसाहेब घाडगे, नामदेव कुमटकर, योगेश राजपूत, प्रकाश राजपूत, प्रविण पोते, बंडू डूचे, प्रशांत जरे, दस्तगीर शेख, शैलेंद्र वारे, यांच्यासह शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
