Add new comment

फडणवीसजी, नोकरभरती केली की यादी द्या- शिवसेना

मुंबई, (प्रतिनिधी):- दोन वर्षांत ७२ हजार सरकारी नोकर्‍या देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘बोलायचे आणि विसरून जायचे. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते,’ असं सुनावतानाच, ’पहिल्या वर्षी ३६ हजार जागा भराल, तेव्हा त्या लोकांची यादीही जाहीर करा,’ असं आव्हान उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या रोजगारासंबंधीच्या घोषणेवर तिरकस भाष्य केलं आहे. एकूण ७२ हजारांपैकी ३६ हजार पदे याच वर्षी भरू, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. या घोषणेचं अभिनंदन करतानाच उद्धव यांनी फडणवीसांना निवडणुकीआधी भाजपनं दिलेल्या आश्वासनांचीही आठवण दिली आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.