लाइव न्यूज़
जात प्रमाणात पडताळणी मुदतवाढ विधेयक मंजूर
Beed Citizen | Updated: March 20, 2018 - 3:09pm
मुंबई, (प्रतिनिधी):- महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक लढविणार्या उमेदवारांना जात प्रमाणात पडताळणीसाठी सहा महिन्याची मुदतवाढ देणारं विधेयक, विधानपरिषदेत आज मंजूर करण्यात आलं. नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मांडलेलं हे विधेयक कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर झालं. त्यापूर्वी हे विधेयक काळ विधानसभेने मंजूर केलं होतं .
जात प्रमाणपत्र पडताळणीअभावी मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आता मुभा देण्यात आली आहे.
Add new comment