लाइव न्यूज़
संपामुळे बालकांचा मृत्यू झाल्यास जबाबदारी विरोधक घेणार का? मेस्मावरून गदारोळ करणार्या विरोधकांना ना. पंकजाताई मुंडे यांचा खडा सवाल
Beed Citizen | Updated: March 21, 2018 - 3:30pm
मुंबई, (प्रतिनिधी):- कुपोषित बालकांना सकस व नियमित आहार मिळावा तसेच यंत्रणेत सुसूत्रता यावी यासाठी अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे, हा कायदा अन्यायकारक नाही असे स्पष्ट करून संपाच्या काळात एखाद्या बालकांवर मृत्यू ओढवल्यास त्याची जबाबदारी आपण घेणार का? असा संतप्त सवाल करून महिला व बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी विरोधकांचा हल्ला परतावून लावला.
मेस्मा कायदा रद्द करावा अशी मागणी विरोधकांनी आज विधानसभेत करून दोन वेळा कामकाज बंद पाडले. या कायद्यावरून अकारण गोंधळ घालणार्या विरोधकांचा हलाला ना. पंकजाताई मुंडे यांनी अतिशय आक्रमकपणे व तितक्याच ताकदीने परतावून लावला. या कायद्याचे प्रखरपणे समर्थन करताना ना. पंकजाताई मुंडे सभागृहात म्हणाल्या की, विरोधकांशी या प्रश्नावर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपानंतर त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या तरीही कांही संघटनांनी संप चालूच ठेवून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला. इतिहासात कधी नव्हे ते अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सेवा ज्येष्ठतेनुसार अडीच हजार रुपये एवढी वाढ तसेच भाऊबीज दुप्पट करण्याचा निर्णय आम्ही घेतला. संघटनेच्या मागणीनुसार अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ६५ केले आहे. भविष्यात त्यांना संपाची गरज भासू नये तसेच बालकांना देण्यात येणा-या आहारात सुसूत्रता व नियमितपणा यावा यासाठीच मेस्मा कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा अन्यायकारक नाही परंतू यावरून कायदा रद्द करावा अशी मागणी विरोधक कशासाठी करत आहेत? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
Add new comment