लाइव न्यूज़
इराकमध्ये अपहरण केलेल्या ३९ भारतीयांना इसिसने मारले - सुषमा स्वराज
Beed Citizen | Updated: March 20, 2018 - 3:08pm

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- इराकमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयंना इसिसने मारल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी आज मंगळवारी राज्यसभेत बोलताना दिली आहे. यामध्ये अनेकजण पंजाब राज्यातील आहेत. २०१४ मध्ये मोसुलमधून काही भारतीयांचे अपहरण झालं होतं. इसिसने ३९ भारतीयांना मारल्याचे पुरावे मिळाल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले. ३८ लोकांचा डीएनए जुळला आहे तर एकोणचाळीसाव्याचा डीएनए ७० टक्के जुळला आहे.
तीन वर्षापूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेने मोसुलचा ताबा घेतल्यानंतर सर्व भारतीयांचे अपहरण करुन ओलीस ठेवलं होतं. मोसुलमधून भारतीय मजुरांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा इसिसने त्यांचे अपहरण केलं होतं.
Add new comment