लाइव न्यूज़
कोरेगाव-भीमा हिंसाचार, न्यायालयीन चौकशीसाठी समितीची नियुक्ती
Beed Citizen | Updated: February 10, 2018 - 3:13pm
कोलकाता हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समितीची नियुक्ती
मुंबई : कोरेगाव - भीमा घटनेच्या न्यायालयीन चौकशीसाठी कोलकाता हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.
चौकशीसाठी समितीला 4 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारात कुणाचा वैयक्तिक सहभाग होता का, घटनेच्या मागे कुणाचा हात होता का, त्यावेळी घटनास्थळी पोलीस उपस्थित होते का, अशा अनेक बाबींची चौकशी या समितीकडून करण्यात येईल. न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्यासह सीएस सुमीत मुळीक यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
Add new comment