Add new comment

मंत्रालयावरून उडी मारून हर्षल रावते नावाच्या तरूणाची आत्महत्या, महिन्यातील तिसरी घटना

मुंबई- मुंबईत मंत्रालयावरून उडी मारून एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हर्षल रावते असे या तरूणाचे नाव असून तो 30 ते 35 या वयोगटातील आहे. त्याला रूग्णालयात दाखल केले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली जात नाहीये.

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, हर्षल रावते हा सहकार विभागात भेटण्यासाठी आला होता. मात्र, त्याचे जे काही काम होते त्याबाबत तो समाधानी नव्हता. काही कळायच्या आताच त्याने मंत्रालयावरून उडी मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर त्याला लागलीच रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या प्रकृतेबाबत अधिकृत माहिती दिली जात नाहीये.
ग्रामीण महाराष्ट्रात काय गंभीर स्थिती आहे आणि शेतकरी लोक किती तणावात आहेत हे वारंवार घडणा-या घटनांतून दिसून येत आहे. सरकारविरोधात ग्रामीण लोकांत प्रचंड रोष असल्याचे यातून सिद्ध होते, सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी, अपेक्षा जयंत पाटील यांनी केली.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.