लाइव न्यूज़
Add new comment
राज्यसभा निवडणुकीतून भाजपाच्या विजया रहाटकर यांची माघार
Beed Citizen | Updated: March 15, 2018 - 3:00pm

मुंबई, (प्रतिनिधी):-राज्यसभेच्या सहा जागांसाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. भाजपने मात्र तीन जागांसाठी चौथा उमेदवार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनाही रिंगणात उतरवले होते. परंतु, आज (गुरूवार) अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. रहाटकर यांच्या उमेदवारीमुळे एका उमेदवाराचे भवितव्य धोक्यात आले होते. आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजपाकडून राज्यसभेसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन यांना उमेदवारी दिली. शिवसेनेकडून अनिल देसाई, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण तर कॉंग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, भाजपाने चौथा उमेदवार म्हणून रहाटकर यांना रिंगणात उतरवल्याने चुरस निर्माण झाली होती. निवडणूक झाल्यास कोणत्या पक्षाला फटका बसेल याची चर्चा राजकीय आखाड्यात रंगली होती. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.