लाइव न्यूज़
ते द्वेषाचं राजकारण करतात, आम्ही प्रेमाचं : राहुल गांधी
Beed Citizen | Updated: March 17, 2018 - 3:26pm
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था):- देशात द्वेष पसरवला जात आहे, देशाला विभागलं जात आहे, मात्र आपण देशाला जोडण्याचं काम करुया, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना केले. ते कॉंग्रेस महाअधिवेशनाच्या छोटेखानी भाषणात बोलत होते.
कॉंग्रेसचं हे महाअधिवेशन बदलाची भाषा करेल. कॉंग्रेस बदल करते, मात्र भूतकाळ विसरत नाही. अनुभवी नेत्यांना सोबत घेऊन, त्यांच्या मार्गदर्शनात तरुण नेतृत्त्व कॉंग्रेसला पुढे घेऊन जाईल., असे राहुल गांधी यांनी सांगितले.
भारत देश सर्वांचा आहे, प्रत्येक धर्माचा आहे, प्रत्येक जातीचा आहे. त्यामुळे कॉंग्रेस प्रत्येकासाठी काम करेल, असेही राहुल गांधी म्हणाले.
यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, देश थकलेल्या अवस्थेत आहे. तरुणांना रोजगार देण्यात पंतप्रधान मोदी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे देशातील तरुणांना मोदींकडून आशा राहिली नाही.
Add new comment