खा. पूनम महाजन माफी मागा: विरोधक
नवी दिल्ली-व्रतसेवा राज्यासह देशात चर्चेत असलेल्या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चबद्दल भारतीय जनता पक्षाच्या खासदार पुनम महाजन यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. 6 दिवसांपासून नाशिक ते मुंबई पायी चालत निघालेल्या 30-40 हजार शेतकऱ्यांच्या मोर्चाला खासदार महाजन यांनी नक्षल चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणाल्या, 'शेतकरी आंदोलनातून शहरी माओवाद डोकावत आहे. यामध्ये सर्व लोक हे लाल झेंडे घेऊन निघाले आहे.' काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुनम महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण म्हणाले, की पुनम महाजन यांना शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा अधिकार नाही. रक्ताळलेल्या शेतकऱ्यांचा त्यांनी अपमान केला आहे. यासाठी पुनम महाजन यांनी माफी मागितली पाहिजे.
'आंदोलनातून माओवाद डोकावतोय'
- शेतकऱ्यांच्या लाँगमार्चचे आज महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधकांनी मोर्चा संयमाने येत असल्याचे कौतूक केले. शिवसेनेनेही मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे म्हटले आहे.
- शांततेत मुंबईपर्यंत आलेल्या या मोर्चाबद्दल एका मराठी वृत्त वाहिनीने भाजप खासदार पुनम महाजन यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात असलेल्या लाल झेंड्याबद्दल आक्षेप घेतला.
- पुनम महाजन म्हणाल्या, 'या आंदोलनातून शहरी माओवाद डोकावताना दिसत आहे. यामध्ये लाल झेंडे घेऊन शेतकरी निघाले आहेत.'
- खासदार महाजन यांच्या वक्तव्याने आंदोलनाला नक्षली रंग देण्याचा प्रयत्न झाला आहे. यावर आंदोलनातून अजून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
Add new comment