पोटच्या ३ वर्षाच्या मुलीसह सासूच्या खुनाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
मुलगी व सासूला रॉकेल टाकून क्रूरपणे जाळून मारले
अस्मानाबाद:-पोटच्या ३ वर्षाच्या मुलीसह सासूचा क्रूरपणे जाळून खून केल्याप्रकरणी मिनाक्षी पांचाळ या महिलेला उस्मानाबाद कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे..
दुहेरी खून प्रकरणी मिनाक्षी पांचाळ या महिला आरोपीला जन्मठेप सुनावली असून आरोपी महिला एस.टी. महामंडळात कंडक्टर म्हणून काम करीत होती.. सर्व महत्वाचे साक्षीदार फितूर झाले असताना सासूचा मृत्यूपूर्व जबाब महत्वाचा ठरला.
मयत सासू कलावती ही आपल्याकडेच का राहते ? दुसऱ्या मुलाकडे का जात नाही म्हणून आरोपी मिनाक्षी सतत भांडत होती मात्र २७ मार्च २०१५ रोजी या दोघीत कडाक्याचे भांडण झाले यानंतर सासू घरात ३ वर्षाच्या मुलीसोबत खेळत बसली असता मीनाक्षीने पोटच्या मुलीचा विचार न करता घरातील रॉकेल"ने भरलेले २ कॅड मुलगी श्रद्धा व मीनाक्षी हिच्या अंगावर ओतून पेटवून दिले..या नंतर सासू व मुलीला उपचारासाठी अंबेजोगाई येथे नेले असता उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला..घ
या संपूर्ण प्रकरणात सासूचा मुत्यूपूर्व जबाब महत्वाचा ठरला व जिल्हा न्यायाधीश एस ए आर औटी यांनी आरोपीस जन्मठेप व २ हजारांचा दंड ठोठावला असल्याची माहिती सरकारी वकील जयंत देशमुख यांची दिली.तत्कालीन पोलीस निरीक्षक सी एल सावळे व उपअधीक्षक शिलवंत ठवळे यांनी केलेला तपास महत्वाचा ठरला..
Add new comment