खादी ग्रामोद्योगाच्या डायरीवर पुन्हा महात्मा गांधींऐवजी मोदींचा फोटो !
गेल्या वर्षी टीकेचं धनी झाल्यानंतर यंदाही भाजप सरकारनं 'पहिले पाढे पंचावन्न'चा कित्ता गिरवलाय. यंदाच्या खादी ग्रामोद्योगाच्या डायरीवरून महात्मा गांधींना गायब केलंय. डायरीच्या पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो छापण्यात आलाय. गेल्या वर्षी खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडरवरून सरकारनं महात्मा गांधींना गायब केलं होतं. यावर्षी डायरीवरून गांधींना गायब केलंय.२०१८ ची खादी ग्रामोद्योग आयोगाची ही डायरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा फोटो पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. पण हे खरं आहे. महात्मा गांधींऐवजी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या डायरीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकतायेत. खादी ग्रामोद्योगाची स्थापना ६१ वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी केली होती. तेव्हापासून सुरू असलेला हा उद्योग तसाच सुरू आहे.खादी ग्रामोद्योग आयोगाच्या 2018 डायरीवरही महात्मा गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलाय.या मुद्यावरून राष्ट्रीय पातळीवर टीकेची झोड उठली होती. पण पुन्हा गांधींऐवजी मोदींचा फोटो बघून राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. कुठल्याही राजकीय पक्षाने त्यात अशापध्दतीचा हस्तक्षेप केला नव्हता म्हणूनच हा फोटो बघून विरोधकांनी पुन्हा टीकास्त्र सोडलंय.भाजप नेत्यांनी मात्र याबाबत मौन बाळगलंय. पण भाजप सरकार हे स्वत: ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्यात अधिक तत्पर असल्याची टीका विरोधकांकडून नेहमीच होते. पण हा फोटो बघून याची सीमा गाठल्याचं समोर आलंय.
Add new comment