परळीतील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रतिवर्षी पांचशे रुपयांची वाढ ना.पंकजाताई मुंडेंच्या पुढाकाराने उर्जामंत्र्यांसोबत मंत्रालयात झाली प्रकल्पग्रस्तांची बैठक
मुंबई(प्रतिनिधी)परळी वीज महानिर्मिती कंपनीतील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थिंना रुजू झाल्याच्या वर्षापासून प्रतिवर्षी पांचशे रुपयांची मानधनवाढ देण्यात येणार असून नव्या भरती प्रक्रियेतही त्यांना ग्राहय धरले जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने उर्जामंत्र्यांसोबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
परळीतील वीज महानिर्मिती प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत परळी थर्मलसमोर नुकतेच उपोषण केले होते. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मध्यस्थी करून हे उपोषण सोडवले होते, त्यानंतर त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे आज ना.पंकजाताई मुंडे यांनी मंत्रालयात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन त्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली.
परळीच्या वीज महानिर्मिती मधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असून त्यांच्या विविध समस्यांना आपण न्याय दिला असल्याचे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. आज झालेल्या बैठकीत ज्या प्रशिक्षणार्थीच्या मानधनाची सुरवात आठ हजार रुपयांपासून झाली आणि त्यांना आज दहा वर्षे झाली असतील तर त्यांना आठ हजाराशिवाय प्रतिवर्षी पाचशे याप्रमाणे दहा वर्षाचे पाच हजार रुपये मानधनवाढ होणार असून त्यांना एकूण तेरा हजार रुपये मानधन होणार आहे. पाच वर्ष काम करणाऱ्यांना २५ गुण मिळाल्यास नवीन भरती प्रक्रियेत परिक्षेस पात्र उमेदवार म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठीच्या रिक्त जागाही तातडीने भरण्याचे बैठकीत सांगण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना या पुढे दोन लक्ष रुपयाचे विमा कवच तसेच त्यांना सुरक्षा साधनांची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. महानिर्मितीचे २३ जानेवारी २०१८ चे चारशे क्रमांकाचे परिपत्रकही रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
*प्रकल्पग्रस्तांनी मानले ना.पंकजाताई मुंडे यांचे
ना. पंकजाताई मुंडे हया प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी नेहमीच खंबीरपणे उभ्या असतात. या प्रश्नांतही त्या सुरवातीपाहून आमच्या पाठिशी होत्या. दिलेल्या शब्दांप्रमाणे त्यांनी बैठक घेऊन मानधनवाढ व इतर मागण्यांबाबत आम्हाला न्याय दिला आहे अशा शब्दांत प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमोल गिराम, उपाध्यक्ष अमोल बिडगर, सचिव महादेव दहिफळे, शशिकांत केंद्रे, शरद बीडगर, बाळासाहेब बीडगर, दत्ता काकडे, नीलेश आवारे आदींनी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले.
Add new comment