शिवनेरी गडावर भाजप विरोधी घोषणा; पंकजा मुंडे आणि विनोद तावडेना शिवसैनिकांनी रोखले

पुणेहिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर संतप्त शिवसैनिकांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना रोखले. इतकेच नाही तर 'भाजप सरकार हाय हाय'च्या घोषणा दिल्या.

 

दरम्यान, सकाळी शिवसैनिकांना गडा जाण्यासाठी पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे काही शिवसैन‍िक संतप्त झाले होते.

 

व्हीआयपी संस्कृती बंद करा...

व्हीआयपी संस्कृती बंद करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे. प्रवेश पास असलेल्या शिवप्रेमींनाच गडावर सोडण्यात येत असल्याने हजारो शिवभक्तांना गडाच्या पायथ्या वरूनच माघारी जावे लागले. त्यामुळे या शिवभक्तांना राग अनावरण झाल्याने त्यांनी मंत्र्यांना रोखले.

 

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचे बालपण गेले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केली आहे. मात्र शासकीय कार्यक्रम असल्यामुळे शिवसैनिकांना शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोलिसांनी अडवून धरले. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केले.

 

विनोद तावडे आणि पंकजा मुंडे परत जात असताना संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांना अडवले. आणि पंकजा मुंडे आणि विनोद तावडेना जाब विचारला. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री हाय हाय , भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तमध्ये मंत्र्यांनी कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.