नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते महिला बचत गटांना फिरता निधीचे वाटप
सिल्लोड ( प्रतिनिधि ) दि.22 अंत्योदय राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत सिल्लोड नगर परिषदेतील महिला बचत गटांना फिरते भांडवल म्हणून प्रत्येकि महिला बचत गटास 10 हजार रूपयांचा धनादेश नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्याहस्ते देण्यात आला. शुक्रवार ( दि.16 ) रोजी नगर परिषद कार्यालयात धनादेश वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले की सिल्लोड नगर परिषदेने बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले. अनेक महिला आज बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी झाले असल्याचे स्पष्ट करीत महिलांनी एकत्र येवून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक क्रांति घडवली पाहिजे असे प्रतिपादन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
या प्रसंगी शहरातील एकूण 22 महिला बचत गटांना प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे फिरता निधीचे धनादेश देण्यात आले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्षा शकुन्तलाबाई बन्सोड, नगर परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते नंदकिशोर सहारे, नगर सेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, वकील वसईकर, सत्तार हुसेन, रईस मुजावर, ऍड संदीप ढाकरे, प्रकल्प समनव्यक देवेंद्र सूर्यवंशी, संगीत आरके आदींसह महिला बचत गटाच्या पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या.
Add new comment