Add new comment

प्रोझोन मॉलमधील ब्रँडेड स्टोअरवर ED चा छापा

औरंगाबाद- पंजाब नॅशनल बॅंकेच्या 11400 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयच्या (ईडी) पथकाने शहरातील प्रोझोन मॉलमधील शॉपर्स स्टॉपवर छापा टाकला आहे. सोमवारी सकाळीपासून दिल्लीहून आलेले ईडीचे आठ जणांचे पथक चौकशी करत आहे.

 

दुसरीकडे, नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेली पंजाब नॅशनल बँकेची मुंबईतील ब्रँडी हाऊस शाखा आज (सोमवारी) सील करण्यात आली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या शाखेमध्ये येण्यास सर्वांवर बंदी घातली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.