गेवराई

बोलेरोची मोटारसायकलला धडक ; बँक व्यवस्थापकासह दोघे ठार

गेवराई ( इर्शाद शेख ) भरधाव वेगातील बोलेरो गाडीने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. रांजनी ( ता. गेवराई ) येथे बुधवारी ( दि.7 ) रात्री 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मृतात कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकासह गेवराई उप जिल्हा रुग्णालयातील शिपायाचा समावेश आहे.

शासकीय तूर खरेदी तात्काळ सुरु करा* - *गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आंदोलनाचा इशारा

गेवराई, दि.०२ (प्रतिनिधी) ः- शासनाने दि.१ फेब्रुवारीपासून राज्यभर हमीभावाने तूर खरेदीची घोषणा करूनही गेवराई येथील शासकीय धान्य खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरु न झाल्यामुळे गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शासकीय तूर खरेदी तात्काळ सुरु करावी या मागणीसाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तूर खरेदी सोमवारपर्यंत चालू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यावेळी देण्यात आला.

भोजगावचे उपसरपंच विक्रम संत,माजी सरपंच संदिपान संत यांच्यासह असंख्य युवकांचा बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश

गेवराई ( प्रतिनिधी )   तालुक्यातील भोजगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच विक्रम संत, माजी सरपंच संदिपान संत यांच्यासह असंख्य युवकांनी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली व जि.प. सभापती युधाजित पंडित यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

मृतदेह आणण्यासाठी जात असतांना कार पलटली; दोन ठार

गेवराई (प्रतिनिधी) विज वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या नातेवाईकाचा खांबावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना कनकवली (जि.रत्नागिरी) येथे घडली होती. सदरिल नातेवाईकाचा मृतदेह घेवून येण्यासाठी जाणार्‍या नातेवाईकांची कार पलटी होवून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना रात्री मादळमोही जवळ घडली.

वाळु वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने दोघांना चिरडले एकाचा मृत्यू; संतप्त जमावाने महामार्ग अडविला; तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

गेवराई (प्रतिनिधी) अवैध वाळु उपसा करून त्याची वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने मोटारसायकल स्वारांना चिरडल्याची घटना रात्री कोल्हेरजवळ घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदरिल घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडविला. यामुळे तासभर वाहतुक ठप्प झाली होती. अवैध वाळु वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

गेवराईत महावितरण कर्मचारी पोलवरून पडल्याने गंभीर जखमी

गेवराई- वीज बील न भरन्याच्या कारणावरून अनेक ठिकानचे शेतीचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत.आज सकाळी रोहीतळ येथील कनेक्शन तोडत असताना विजेच्या पोलवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली.या घटनेला सर्वस्वी अभियंता ढाकणे हे जबाबदार असल्याचे सांगन्यात आले असून जखमी कर्मचार्यास औरंगाबाद येथे हलविन्यात आले.

बांदाच्या वादातुन कुर्‍हाडीने मारहान ; चौघे गंभीर ; गुळज येथील घटना

गेवराई प्रतिनिधी 
ऊस लागवड करत आसतांना आमच्या बांधाच्या कडील गींनी गवत का लावतो मनत गुळज येथील शेतकरी कुटुंबाला जबर मारहान करण्यात आली या मारहानीत गवारे कुटुंबीय गंभीर जखमी झाले आसुन घटना काल शुक्रवार रोजी घडली असून  उपचारा साठी उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे दाखल करन्यात आले आहे

Pages