Add new comment

गेवराईत महावितरण कर्मचारी पोलवरून पडल्याने गंभीर जखमी

गेवराई- वीज बील न भरन्याच्या कारणावरून अनेक ठिकानचे शेतीचे वीज कनेक्शन तोडले जात आहेत.आज सकाळी रोहीतळ येथील कनेक्शन तोडत असताना विजेच्या पोलवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली.या घटनेला सर्वस्वी अभियंता ढाकणे हे जबाबदार असल्याचे सांगन्यात आले असून जखमी कर्मचार्यास औरंगाबाद येथे हलविन्यात आले.
गेल्या काही दिवसापासून वीज मंडळाकडून शेतकर्याचे वीज कनेक्शन तोडल् जात आहेत.आज सकाळी रोहीतळ येथील वीज कनेक्शन तोडन्यासाठी सचिन खाडे या कर्मचार्यास पाठविले होते.कनेक्शन तोडत असताना त्याला विजेचा शॉक लागून तो पोलवरून खाली पडला.या घटनेला सर्वस्वी वीज मंडळासह इंजीनियर ढाकणे हे जबाबदार असल्याचे सांगन्यात आले.वीजेचे कनेक्शन तोडताना वीज आली कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.अधिकार्याच्या हलगर्जीपनामुळे जखमी झालेल्या खाडे यांना उपचारार्थ औरंगाबाद येथे हालविन्या आले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.