Add new comment

मृतदेह आणण्यासाठी जात असतांना कार पलटली; दोन ठार

गेवराई (प्रतिनिधी) विज वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या नातेवाईकाचा खांबावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना कनकवली (जि.रत्नागिरी) येथे घडली होती. सदरिल नातेवाईकाचा मृतदेह घेवून येण्यासाठी जाणार्‍या नातेवाईकांची कार पलटी होवून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना रात्री मादळमोही जवळ घडली.
गेवराई येथील कृष्णा मस्के हा तरूण रत्नागिरी जिल्ह्यातील कनकवली येथे विज कंपनीत कार्यरत होता. खांबावरून पडल्याने काल सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. गेवराई येथील नातेवाईक स्विफ्ट मधुन चालक विशाल घोडे (रा.राजपिंपरी) व वैभव मस्के हे जात होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मादळमोहीजवळ त्यांची कार पलटी झाली. त्या अपघातात चालक विशाल घोडे व वैभव मस्के या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.