Add new comment

बोलेरोची मोटारसायकलला धडक ; बँक व्यवस्थापकासह दोघे ठार

गेवराई ( इर्शाद शेख ) भरधाव वेगातील बोलेरो गाडीने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. रांजनी ( ता. गेवराई ) येथे बुधवारी ( दि.7 ) रात्री 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मृतात कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकासह गेवराई उप जिल्हा रुग्णालयातील शिपायाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील रांजनी ( ता. गेवराई ) येथेे बीडकडून येणाऱ्या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या बोलेरो ( क्र.mh 24 व्ही - 3277 ) गाडीने जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकल ( क्र.mh 23 AL- 3583 ) वरील शिवलाल लक्ष्मण धुळे ( वय 50, रा. औरंगाबाद ) व रजनीश पांडुरंग वाघमारे ( वय 38 , रा. भीम नगर गेवराई ) यांचा जागीच मृत्यू झाला. मयत शिवलाल धुळे हे गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक म्हणून तर रजनीश वाघमारे हे गेवराई उप जिल्हा रुग्णालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. दोघांच्या अपघाती निधनाची माहिती कळताच अनेकांनी उप जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.