लाइव न्यूज़
बदामराव पंडित यांच्या प्रयत्नामुळे पालकमंत्री पंकजाताईं मुंडे कडून गेवराई तालुक्यातील 9 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी
Beed Citizen | Updated: February 6, 2018 - 9:41pm
रस्त्यांची कामे दर्जेदारच करून घेणार -- सभापती युधाजित पंडित
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्याची दखल घेऊन, जिल्ह्याच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी जवळपास 9 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. बदामराव पंडित यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी प्रयत्न करून, निधी आणल्याबद्दल संबंधित गावकऱयांनी समाधान व्यक्त केले आहे. तर सदर रस्त्यांची कामे दर्जेदारच करून घेणार असल्याचे जि.प. सभापती युधाजित पंडित यांनी म्हटले आहे.
माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी दि 30 जुलै 2017 रोजी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या बीड जिल्ह्याच्या अध्यक्षा, पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्याकडे तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामास मंजुरी देण्याची मागणी केली होती. यात मालेगाव खुर्द. पाथरवाला बु., गुंतेगाव, पाथरवाला खुर्द, बेलगुडवाडी, सावळेश्वर, मारुतीची वाडी, हिंगणगाव, चोरपुरी, सुरळेगाव, महादेव तांडा, दादेवाडी, भोगलगाव तांडा, पांगुळगाव, गोविंदवाडी, खेर्डा, म्हाळसपिंपळगाव या गावासाठीच्या रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाचा समावेश होता. या कामांपैकी बदामराव पंडित यांच्या शिफारशीवरून वीटभट्टी ते बरड 100.22 लक्ष,गणेशनगर ते मारूती मंदिर 55.90 लक्ष. पाथरवाला 100. 59 लक्ष, रा.मा.62 ते गुंतेगाव 93.98 लक्ष, पाथरवाला खुर्द 94.18 लक्ष, MDR 20 बेलगुडवाडी 145.80 लक्ष, MDR 20 ते मारुतीचीवाडी 217.17 लक्ष, आणि MDR 24 ते सुरळेगव 203.42 लक्ष अशा एकूण जवळपास 9 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना पालकमंत्री ना पंकजाताई मुंढे यांनी मंजुरी दिली आहे. सदर रस्त्यांमुळे जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने, ग्रामस्थानी शिवसेनेचे नेते बदामराव पंडित व पालकमंत्री ना पंकजाताई यांचे आभार मानले आहेत. याबाबत बोलताना सभापती युधाजित पंडित म्हणाले की, तालुक्यातील गोदाकाठचे सर्व पांदिचे रस्ते, बदामराव पंडित यांच्या प्रयत्नामुळेच दर्जेदार आणि मजबूत डांबरी तयार करण्यात आले होते. आजही सदरचे रस्तेच ग्रामस्थाना दळणवळणासाठी कामी येत आहेत. तालुक्याला दोन आमदार आहेत मात्र त्यांच्याकडून सार्वजनिक विकासाचे कामे पाहिजे त्या गतीने होत नाहीत. मात्र बदामराव पंडित आमदार नसतानाही त्यांच्या प्रयत्न आणि तळमळीमुळे तालुक्यात विकास कामे होत आहेत. सदर कामे दर्जेदारच करून घेतली जातील असेही युधाजित पंडित म्हणाले.
Add new comment