अंबाजोगाई

नंदकिशोर मुंदडांचे उपोषण सुरूच; केजमध्ये रास्ता रोका

अंबाजोगाई,(प्रतिनिधी):-  तालुक्यातील श्रीपतरायवाडी शिवारात बांधण्यात आलेले स्त्री रुग्णालय व वृध्दत्व निवारण, मनोरुग्णालयाच्या इमारतीवर करोडो रुपये खर्च होऊन सुध्दा अद्यापही हे रुग्णालय सुरु झालेले नाही, ते त्वरीत सुरु करावे या मागणीसह इतर मागण्यासाठी डॉ.विमलताई मुंदडा विचार मंचच्या वतीने जेष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा व त्यांचे सहकारी यांचे उपजिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच असून त्यांना पाठिंबा म्हणून आज सकाळी मुंदडा समर्थकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले. यामुळे बराचवेळ वाहतुक ठप्प झाली होती. 

बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस; पाठींबा म्हणून केजमध्ये उद्या रास्ता रोको

अंबाजोगाई(प्रतिनिधी) जनसामान्यांच्या प्रश्‍नासाठी नंदुशेठ मुंदडा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसंदर्भात त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज दुसरा दिवस असुन नंदुशेठ यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी केज येथे उद्या सोमवार दि.२९ रोजी शिवाजी चौकात रस्ता रोको करण्याचा इशारा समर्थकांनी दिला आहे. दरम्यान लोकहिताच्या कामासाठी नंदुशेठ थेट उपोषणाला बसले असुन त्यांना सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे.

Pages