लाइव न्यूज़
अंबाजोगाई : लोकोपयोगी मागण्यांसाठी नंदकिशोर मुंदडा यांच्या अमरण उपोषणाला सुरुवात
अंबाजोगाई : महिनाभरापूर्वी शासनाला इशारा दिल्यानुसार ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी विविध लोकोपयोगी मागण्यांसाठी आज शनिवारपासून अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली. मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात शासनाकडून लिखित ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केला. मुंदडा यांच्या समवेत विमलताई मुंदडा विचारमंचच्या दहा कार्यकर्त्यांनी देखील उपोषणात सहभाग घेतला आहे.
Add new comment