लाइव न्यूज़
द्वारकाधीश मित्र मंडळाचे शेख अयाज यांना मातृशोक

द्वारकाधीश मित्र मंडळाचे
शेख अयाज यांना मातृशोक
बीड ( प्रतिनिधी ) येथील द्वारकाधीश मित्र मंडळाचे पदाधिकारी शेख अयाज यांच्या आई शेख रब्बानी बेगम शेख सलाउद्दीन यांचे दि.4 जानेवारी रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी त्या 60 वर्षांच्या होत्या. आज रविवार दि.5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बीड शहरातील शहेंशाहवली दर्गाह परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात शेख आयाज , शेख एजाज ही दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावाच्या म्हणून त्या परिचित होत्या. शेख कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.
Add new comment