बीडमध्ये ऍड. पटेल दाम्पत्यासह चौघांकडून घरात घुसून धुडगुस

बीडमध्ये  ऍड. पटेल दाम्पत्यासह 
चौघांकडून घरात घुसून धुडगुस

महिलेला दमदाटी ; ऍड. पटेल पती - पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल

बीड दि.20 ( प्रतिनिधी ) कुटुंबातील कोणीही घरात नसताना बळजबरीने आत घुसून  धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत तुझ्या घरच्यांना बघून घेऊ असे म्हणत वकील दांपत्यासह चौघांनी धुडगूस घातल्याचा प्रकार पेठ बीड हद्दीत घडला. याप्रकरणी वकील ऍड.नासेर पटेल , त्यांची पत्नी आसमा पटेल यांच्यासह शरद झोंडगे , पायल पारवे या चौघाविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका वकील दांपत्यावर पुन्हा दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील खंडेश्वरी रोड पेठ बीड येथील सरिता इंद्रजीत पारवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 19 जून 2024 रोजी मी व माझी दोन मुले घरात होतोत. दीर सत्यजित यांचे किडनी ट्रान्सफरचे ऑपरेशन असल्याने माजी सासू , पती व कुटुंबातील इतर सर्वजण छत्रपती संभाजी नगर येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये गेले होते. घरात मी माझ्या मुलासह एकटी असताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऍड.नासेर पटेल, त्यांची पत्नी आसमा नासर पटेल , शरद झोंडगे हे चौघेजण त्या ठिकाणी आले. एड. पटेल यांनी सत्यजित कुठे गेला? असे विचारले. त्यावर मी त्यांना ते इथे नाहीत त्यांचे ऑपरेशन झाल्याने छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात गेले आहेत असे सांगितले. तरीही पटेल यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्यांना अडवले असता नासेर पटेल यांनी अरेरावी करत मला ढकलून दिले तर आसमा पटेल हिने शिवीगाळ केली. सत्यजित घरात नाहीत असे म्हणत असताना देखील पटेल यांच्यासह चौघेजण घरात घुसले आणि सत्यजित घरातच आहे असे म्हणून सर्व घरांमध्ये त्यास शोधू लागले. मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता चौघांनीही मला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व तुला आणि तुझ्या घरच्यांना बघून घेऊ अशी धमकी दिली. यावेळी पटेल दाम्पत्यासोबत आणखी महिला देखील होती.मात्र तिचे नाव समजू शकले नाही. दरम्यान याप्रकरणी सरिता पारवे यांच्या फिर्यादी वरून  ऍड.नासेर पटेल , त्यांची पत्नी ऍड.आसमा पटेल यांच्यासह शरद झोंडगे , पायल पारवे या चौघांविरुद्ध कलम 452, 323, 504, 506 ,  34 भादवी प्रमाणे पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.