राजश्री शाहु नागरी सह. पतसंस्थेची रक्कम घेवून जाणाऱ्या कॅशयरला लुटून नेणारे टोळीचा पर्दापाश करून एकाच बेड्या ठोकल्या स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

 

 

बीड (प्रतिनिधी)दिनांक 16/02/2024 रोजी 08:20 वा. सुमारास फिर्यादी गणेश सुभाषराव देशमुख व सह योगेश लोभेकर असे राजश्री शाहु नागर सह पतसंस्थेची दिवसभर जमा झालेली रु. 39,16,160/- रक्कमेची बॅग मोटार सायकलवर बसुन बँकेचे मॅनेजरकडे जमा करण्यासाठी जात असतांना मुकूंदराज कॉलनी नवा मोंढा रोड येथे आले असता पाठीमागुन तीन अनोळखी इसम मोटार सायकलवरु त्यांचेजवळ येवून फिर्यादीचे मोटार सायकल मोटार सायकल आडवी लावून फिर्यादीचे डोक्याला बंदुक व गळयाला चाकु लावून पाठीमागे बसलेल्या योगेश्‍ लोभेकर यांचेकडील बँकेची कॅश रु. 39,16,160/- पैशाची बँग व फिर्यादीचा मोबाईल बळजबरीने चोरुन नेले म्हणुन पो.ठा.अंबाजोगाई शहर येथे गुरनं 64/2024 कलम 392,34 भादंवि सह 3/25 भारतीय हत्यार कायदान्वये दिनांक 17/02/2024 रोजी गुन्हा नोंद झाला आहे. 

सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक,बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांना मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते. सदरचा पोलीस दलासाठी आव्हानात्मक होता. गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.यांनी अभिलेखावरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांचा विष्लेशण करत असतांना गुप्त बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा नारायण शाहुराव जोगदंड रा.अंबा. कारखाना जि.बीड याने त्याचे इतर तीन साथीदाराने केला असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यावरून पो.नि.श्री.संतोष साबळे यांनी आरोपी शोध घेण्यासाठी पोउपनि श्री. श्रीराम खटावकर यांचे पथकास मार्गदर्शन करुन रवाना केले. स्थागुशा पथकाने अंबा.कारखाना परिसरात आरोपीचा शोध घेतला असता इसम नारायण जोगदंड हा त्याचे अंबा साखर कारखाना वाघाळा वसाहतीत घरी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाअनुषंगाने बारबाईने विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर तीन साथीदार अशांनी बँकेचे पैसे लुटण्याचा प्लान करुन पैसे घेवुन निघताच मोबाईल वरुन सांगण्याचे व मिळालेली रक्कम आपसात वाटून घेण्याचे ठरवले होते. त्यावरुन उक्त नमुद आरोपीने त्याचे इतर साथीदारांना सदरची टिप देवून बँकेचे पैसे लुटीचा गुन्हा केला आहे. त्यावरुन सदर आरोपीचे ताब्यातुन गुन्हयांतील त्याचे हिश्शाला आलेली 9,00,000/- रु ची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. 

आरोपी नामे नारायण शाहुराव जोगदंड वय 27 वर्षे रा. अंबा. सहकारी साखर कारखाना वाघाळा ता.अंबाजोगाई यास पुढील कारवाईकामी पो.ठा. अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. उर्वरित तीन निष्पन्न फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा,बीड शोध घेत आहे. 

सदरची कामगिरी ही नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक बीड,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, देविदास जमदाडे, गणेश हांगे, अश्विनकुमार सुरवसे, नारायण कोरडे, चालक/सुनिल राठोड सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी केलेली आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.